Mumbai : मढ येथील समुद्रात वाहून गेली 5 मुले; २ मुलांना शोधण्यात यश 

200

मुंबईच्या मालाड परिसरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. मढ येथे 5 मुले समुद्रात वाहून गेली आहेत. सकाळी साडेदहा वाजताच्या सुमारास मुंबई फायरब्रिगेडला याबाबत माहिती देण्यात आली. या मुलांना शोधण्याची मोहीम सुरू आहे. यात २ मुलांना शोधण्यात यश आले आहे, मात्र तीन मुले अजून बेपत्ता आहेत.

शोध लागलेल्या मुलांची नावे कृष्णा हरिजन (१६), अंकुश शिवारे (१२) अशी आहेत तर शुभम जयस्वाल (१२), निखिल कायमकूर (१३) आणि अजय हरिजन (१२) हे तिघे अजून बेपत्ता आहेत, त्यांचा शोध सुरु आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे.

(हेही वाचा Heavy Rain : दिल्ली बुडाली आता ‘या’ राज्यांना दिला अलर्ट )

महिला मुलांसमोरच लाटेसोबत वाहून गेली

दोन दिवसांपूर्वीच मुंबईतील वांद्रे येथूनही नुकतीच एक धक्कादायक घटना समोर आली होती. यात समुद्रकिनारी फिरायला जाणं एका कुटुंबाला भलतंच महागात पडलं. मुंबईतील वांद्रे बँडस्टँडजवळ रविवारी संध्याकाळी ज्योती सोनार नावाची महिला तिच्या कुटुंबासह गेली होती. यावेळी ती समुद्राच्या लाटेत वाहून गेली. पती मुकेश आणि त्यांची तीन मुलं ही दुर्दैवी घटना पाहत होती. पती मुकेश या घटनेबद्दल बोलताना म्हणाला, ‘मी तिला वाचवण्याचा सर्वतोपरी प्रयत्न केला. जेव्हा चौथी लाट आम्हाला मागून धडकली तेव्हा माझा तोल गेला आणि आम्ही दोघेही घसरलो. मी माझ्या पत्नीची साडी पकडली आणि जवळच्या एका पर्यटकाने माझा पाय मागून पकडला, पण तिला वाचवता आलं नाही. मुकेशने सांगितलं की, त्यांचं कुटुंब दोन आठवड्यातून एकदा सहलीला जायचं.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.