जम्मू काश्मीरमध्ये (Jammu Kashmir) मोठी दुर्घटना घडली आहे. सीआरपीएफ (CRPF) जवानांना घेऊन जाणारी एक गाडी सिंध नाल्यात कोसळल्याने मोठी दुर्घटना घडली आहे. जम्मू आणि काश्मीरमधील गांदरबल जिल्ह्यात रविवारी ही घटना घडल्याची माहिती आहे. केंद्रीय राखीव पोलीस दलाचे (CRPF) जवानांना घेऊन जाणारं एक वाहन सिंध नाल्यात कोसळल्याने आठ जवान जखमी झाले आहे. सर्व जखमींना बाहेर काढण्यात आलं असून बालटाल बेस कॅम्प रुग्णालयात नेण्यात आले.
जम्मूमध्ये CRPF जवानांसोबत मोठी दुर्घटना
केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या जवानांनी भरलेली गाडी बालटाल मार्गे अमरनाथ गुहेकडे जात असताना हा दुर्दैवी अपघात झाला. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी सकाळी हे वाहन सिंध नाल्यात कोसळलं. सीआरपीएफ जवानांची गाडी जम्मूमधील नाला सिंधमध्ये कोसळल्याने हा अपघात घडला. रविवारी सकाळी निलगिरी हेलिपॅडजवळ CRPF जवानांना घेऊन जाणारं नोंदणी क्रमांक HR36AB/3110 असलेलं वाहन सिंध नदीत कोसळल्यानं अपघात झाला आहे. यामध्ये आठ जवान जखमी झाले आहेत. त्यांना बालटालच्या बेस कॅम्प रुग्णालयात आणण्यात आलं असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.
(हेही वाचा Ajit Pawar : अजित पवार राष्ट्रवादीच्या सर्व मंत्र्यांसह शरद पवारांच्या भेटीला; राजकीय घडामोडींना वेग )
अमरनाथ यात्रेसाठी CRPF जवानांची तैनाती
सध्या पवित्र अमरनाथ यात्रा सुरु आहे. या पार्श्वभूमीवर यात्रेवरील दहशतवादाचा धोका पाहता प्रशासनाकडून बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. अमरनाथ यात्रा अधिक सुरक्षित करण्यासाठी मोठ्या संख्येने CRPF जवान तैनात करण्यात आले आहेत. जम्मू काश्मीरमध्ये यात्रेकरुंच्या सुरक्षेसाठी ही पाऊलं उचलण्यात आली आहेत.
Join Our WhatsApp Community