राज्याच्या सर्वांगीण औद्योगिक विकासासाठी राज्य शासन कटिबद्ध आहे. त्यासाठी महाराष्ट्र आर्थिक सल्लागार समिती गठित करण्यात आली आहे. या समितीने विविध शिफारशी केल्या आहेत. त्यांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी शीघ्र कृती समिती आणि ‘पीएम मित्रा’ च्या माध्यमातून कार्यवाही करण्यात येईल, तसेच या ठिकाणी येणाऱ्या उद्योजकांना सर्व पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी शासन प्रयत्नशील असून उद्योजकांना कुठलीही अडचण भासणार नाही आणि त्यांच्या समस्या सोडविण्यासाठी शासन कटिबद्ध आहे, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी दिली.
अमरावती येथील ‘पीएम मित्रा पार्क’ चे अनावरण हॉटेल ग्रॅण्ड हयात, कलिना, मुंबई येथे केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले, त्यावेळी मुख्यमंत्री शिंदे बोलत होते.
(हेही वाचा – Legislature Monsoon Session 2023 : सत्ताधारी आणि विरोधक पुन्हा आक्रमक होणार; विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला होणार सुरुवात)
मुख्यमंत्री शिंदे (Eknath Shinde) म्हणाले की, आजचा दिवस हा महाराष्ट्र सरकारसाठी विशेष दिवस आहे. कोविड कालावधीनंतर राज्यात आज घडीला मोठ्या प्रमाणात विविध प्रकल्पाचे काम प्रगतीपथावर आहे. मेट्रो, आरे कारशेड, बुलेट ट्रेन, एचटीएमएल, नाव्हाशेवा, कोस्टल रोड यासारखी विविध कामे प्रगतीपथावर आहेत. राज्यात मोठ्या प्रमाणात कुशल मनुष्यबळ, जमीन, पाणी, ऊर्जा, दळणवळणाच्या सुविधा मोठ्या प्रमाणात निर्माण होत आहेत. राज्याला पुढे नेण्यासाठी जे काही प्रयत्न करावे लागतील ते सर्व करण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे. राज्यात गुंतवणूक करणाऱ्या उद्योजकांना विभागाच्या वतीने चांगल्या सुविधा उपलब्ध करून देण्यात येतील. देशाचे पाच ट्रिलियन डॉलर इकोनॉमीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले असून त्यापैकी महाराष्ट्र एक ट्रिलियन डॉलर उद्दिष्ट साध्य करण्याचे काम करेल असेही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी सांगितले. ‘पीएम मित्रा’ च्या माध्यमातून रोजगार उपलब्ध होणार आहे. विशेषतः महिलांना मोठ्या प्रमाणात रोजगार मिळणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
राज्याच्या सर्वांगीण औद्योगिक विकासासाठी महाराष्ट्र शासन कटिबद्ध आहे. त्यासाठी ‘महाराष्ट्र आर्थिक सल्लागार परिषद’ गठीत करण्यात आली आहे. या समितीने विविध शिफारशी केल्या आहेत. त्यांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी शीघ्र कृती समिती आणि ‘मित्रा’च्या माध्यमातून कार्यवाही करण्यात येईल, असे… pic.twitter.com/q21bEQOjNT
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) July 16, 2023
डाओसमध्ये अनेक देशाच्या प्रतिनिधींना महाराष्ट्रातील गुंतवणीसाठी गुंतवणूक संधिची माहिती दिली असून अनेक उद्योगांनी राज्यात गुंतवणुकीसाठी उत्सुकता दाखवली आहे. यावेळी १ लाख ३७ हजार कोटी रुपयांचे करार झाले असून यापैकी ८६ हजार कोटींचे कामे सुरू आहेत.
राज्यामध्ये ७५ हजार सरकारी नोकर भरतीचा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला आहे. समृद्धी महामार्गामुळे अनेक सुविधा निर्माण होत आहेत. या कनेक्टिव्हिटीमुळे इंधन व वेळेची बचत होणार आहे. त्याचबरोबर मुंबईत देखील बदल घडतांना दिसत आहेत. खड्डे मुक्त मुंबई, मुंबईच्या सौंदर्यकीकरणावर भर व स्वच्छतेला प्राधान्य देण्यात आले आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community