Legislature Monsoon Session 2023 : अर्ध्या तासात विधानसभा दिवसभरासाठी तहकूब

सत्ताधाऱ्यांकडून अपेक्षित उत्तर न मिळाल्याने विरोधकांनी विधानसभेतून सभात्याग केला.

184
State Legislature Monsoon Session : दरडोई उत्पन्नात महाराष्ट्राची घसरण; गुजरातने महाराष्ट्राला टाकले मागे

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बंडानंतर आजपासून म्हणजेच सोमवार १७ जुलै पासून विधीमंडळाच्या पावसाळी (Legislature Monsoon Session 2023) अधिवेशनाला सुरुवात झाली. त्यामुळे आता सत्ताधारी आणि विरोधक पुन्हा आमनेसामने आले. मात्र अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी अर्ध्या तासात विधानसभा दिवसभरासाठी तहकूब करण्यात आली.

कामकाज सुरू होऊन अर्ध्या तासातच विधानसभा दिवसभरासाठी तहकूब

पावसाळी अधिवेशनाच्या सुरुवातीलाच शेतकऱ्यांच्या प्रश्नावर विरोधक आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. यावर काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी अनेक प्रश्न उपस्थित केले. त्यावर सत्ताधाऱ्यांकडून अपेक्षित उत्तर न मिळाल्याने विरोधकांनी विधानसभेतून सभात्याग केला. त्यानंतर विधानसभा स्थगित करण्यात आली. दरम्यान, विधानसभेचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं आहे.

(हेही वाचा – Legislature Monsoon Session 2023 : सत्ताधारी आणि विरोधक पुन्हा आक्रमक होणार; विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला होणार सुरुवात)

विधानसभेत शोकप्रस्ताव सादर

दिवंगत खासदार आणि माजी मंत्री गिरीश भालचंद्र बापट, दिवंगत खासदार सुरेश उर्फ बाळूभाऊ नारायण धानोरकर, माजी आमदार शंकरराव लिंबाजीराव वाकुळणीकर (कोळकर), बाबुरावजी जसुजी वाघमारे आणि माजी आमदार रामचंद्र पुनाजी अवसरे यांच्या निधनानंतर विधानसभेत शोकप्रस्ताव सादर करण्यात आला.

शिरसाट-कुणावर तालिका अध्यक्ष

संजय शिरसाट, समीर कुनावर, यशवंत माने, अमित जनक यांची विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात तालिका अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.