Sharad Pawar : पुन्हा होणाऱ्या विरोधकांच्या बैठकीला शरद पवार जाणार नाही; चर्चांना उधाण

काँग्रेसने बोलावलेली ही दुसरी विरोधी पक्षांची एकता बैठक आहे.

160
Sharad Pawar : पुन्हा होणाऱ्या विरोधकांच्या बैठकीला शरद पवार जाणार नाही; चर्चांना उधाण

आज म्हणजेच सोमवार १७ जुलै रोजी पुन्हा एकदा विरोधकांची बैठक होत आहे. मात्र या बैठकीला शरद पवार (Sharad Pawar) जाणार नसल्याने पुन्हा एकदा राजकीय चर्चांना उधाण आले आहे. एकीकडे राज्य विधिमंडळाच्या तीन आठवड्यांच्या पावसाळी अधिवेशनाला आजपासून सुरुवात झाली आहे. तर दुसरीकडे संपूर्ण विरोधी पक्ष पुन्हा एकत्र येणार आहेत. आगामी लोकसभा निवडणुकांपूर्वी विरोधी पक्ष तयारीला लागला आहे. पाटण्यानंतर आता विरोधी पक्षांची पुढील बैठक कर्नाटकातील बंगळुरू येथे होणार आहे. काँग्रेसने बोलावलेली ही दुसरी विरोधी पक्षांची एकता बैठक आहे.

या बैठकीला जवळपास २४ राजकीय पक्षांचे प्रमुख नेते उपस्थित राहणार असल्याची माहीती आहे. या बैठकीचा अजेंडा आणि मिनिट टू मिनिटाचा कार्यक्रमही निश्चित करण्यात आला असून, त्यामुळे या बैठकीत तरी विरोधी एकजुटीच्या दिशेनं विरोधक ठोस निर्णय घेतात का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

(हेही वाचा – Legislature Monsoon Session 2023 : पावसाळी अधिवेशनात ४१ हजार २४३ कोटींच्या पुरवणी मागण्या सादर)

मागच्या बैठकीत महाराष्ट्रामधून शरद पवार (Sharad Pawar) यांच्यासह राज्यातील इतर नेतेही उपस्थित होते. मात्र आजच्या विरोधकांच्या बैठकीला शरद पवार जाणार नाहीत अशी माहिती समोर आली आहे. शरद पवारांनी अचानक कार्यक्रम रद्द केला आहे. तर आज शरद पवार मुंबईत थांबणार आहेत.

अशातच आज विरोधकांच्या बैठकीचा भाग असलेल्या बंगळुरूतील डिनरला शरद पवार उपस्थित राहणार नसल्याची माहिती मिळत आहे. तसेच, टीएमसीच्या प्रमुख ममता बॅनर्जी यांनी या डिनरपासून आधीच स्वतःला दूर केलं आहे. मात्र, १८ जुलै रोजी होणाऱ्या चर्चेत ममता बॅनर्जी सहभागी होणार आहेत. शरद पवार (Sharad Pawar) १७ जुलै रोजी मुंबईत आपल्या आमदारांची भेट घेणार आहेत.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.