Kedarnath Temple : केदारनाथ मंदिर परिसरात फोटो काढणे, व्हिडिओ बनवण्यावर बंदी

197
Kedarnath Temple : केदारनाथ मंदिर परिसरात फोटो काढणे, व्हिडिओ बनवण्यावर बंदी
Kedarnath Temple : केदारनाथ मंदिर परिसरात फोटो काढणे, व्हिडिओ बनवण्यावर बंदी

केदारनाथ मंदिर परिसरात घडणाऱ्या गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी मंदिरात मोबाईल फोन घेऊन जाण्यास, तसेच फोटो काढण्यास आणि व्हिडिओ बनवण्यास बंदी घालण्यात आली आहे. या संदर्भातील स्पष्ट सूचना मंदिर प्रशासनाकडून परिसरात लावण्यात आल्या आहेत. केदारनाथ मंदिर परिसरात मोठ्या प्रमाणात तरुणाई जात असते.

काही दिवसांपूर्वी एका महिला ब्लॉगरने मंदिर परिसरात वादग्रस्त व्हिडिओ बनवून तो व्हायरल केल्याचे समोर आले होते. त्यात एका तरुणीने तिच्या प्रियकराला मंदिरासमोर लग्नासाठी मागणी घातली होती. यानंतर मंदिर समितीने हे पाऊल उचलले आहे. त्यामुळे आता केदारनाथ मंदिरात मोबाईल घेऊन जाण्यास बंदी घालण्यात आली आहे. एवढेच नाही तर आता भाविकांना मंदिर परिसरात फोटोही काढता येणार नाहीत आणि व्हिडिओही बनवता येणार नाहीत.

(हेही वाचा – Sharad Pawar : पुन्हा होणाऱ्या विरोधकांच्या बैठकीला शरद पवार जाणार नाही; चर्चांना उधाण)

यासोबतच भाविकांना सभ्य कपडे घालूनच मंदिरात येण्यास सांगण्यात आले आहे. तसेच मंदिर परिसरात मंडप किंवा छावण्या न लावण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. आदेशाचे पालन न करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई केली जाणार असल्याचेही सांगण्यात आले आहे. असे करताना कोणी आढळल्यास कायदेशीर कारवाई केली जाईल, असे हिंदी आणि इंग्रजी भाषेत असणाऱ्या फलकांवर स्पष्टपणे लिहिले आहे.

केदारनाथ मंदिरात बनवलेले असे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर प्रसारित झाले होते. ज्याबद्दल यात्रेकरू, सामान्य भाविक आणि सोशल मीडिया युजर्सनी आक्षेप घेतला होता आणि धार्मिक स्थळांमधील अशा कृत्यांचा निषेध केला होता. त्या पार्श्वभूमीवर उपरोक्त निर्णय घेण्यात आला आहे.

बद्रीनाथ-केदारनाथ मंदिर समितीचे अध्यक्ष अजेंद्र अजय यांनी यासंदर्भात माहिती दिली आहे. “हे एक धार्मिक ठिकाण आहे, जिथे लोक मोठ्या श्रद्धेने येतात. त्यामुळे भाविकांनी त्याचा आदर केला पाहिजे. बद्रीनाथ धाममधून अद्याप कोणतीही तक्रार आलेली नाही, पण तेथेही असे फलक लावले जातील,” असे अध्यक्ष अजेंद्र अजय यांनी स्पष्ट केले. काही दिवसांपूर्वी मंदिराच्या गाभाऱ्यात जाण्यापूर्वीच भाविकांचे मोबाईल बंद करण्याचे आदेश देण्यात आले होते, मात्र आता संपूर्ण मंदिर परिसरातच मोबाईलला बंदी घालण्यात आली आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.