AI : आता आपल्या भाषेतून शिका AI तेही मोफत; केंद्र सरकारची नवी मोहीम

229
AI : आता आपल्या भाषेतून शिका AI तेही मोफत; केंद्र सरकारची नवी मोहीम

सध्या संपूर्ण भारताची वाटचाल ‘डिजिटल इंडिया’कडे होत आहे. अगदी ग्रामीण भागातदेखील डिजिटल सिस्टीम सुरु झाली आहे. अशातच सध्या सगळीकडेच ‘एआय’ (AI) म्हणजेच आर्टिफिशिअल इंटेलिजन्सचा बोलबाला आहे. त्यामुळेच भविष्यात करिअरच्या लाखो संधी एआयमध्ये उपलब्ध होण्याची शक्यता आहे. याच पार्श्वभूमीवर भारत सरकारने ‘एआय फॉर इंडिया २.०’ ही मोहीम सुरु केली आहे.

केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी शनिवारी (१५ जुलै) जागतिक युवक कौशल्य दिनानिमित्त या मोहिमेची (AI) घोषणा केली. यावेळी बोलतांना त्यांनी सांगितले की, एआयबद्दलचे सध्याचे बहुतांश कोर्स हे इंग्रजी भाषेत उपलब्ध आहेत. त्यामुळे भारतातील कित्येक नागरिक यापासून वंचित राहत होते. आता या मोहिमेच्या माध्यमातून एआयचे कोर्स नऊ भारतीय भाषांमध्ये उपलब्ध करण्यात येणार आहे.

(हेही वाचा – Sharad Pawar : पुन्हा होणाऱ्या विरोधकांच्या बैठकीला शरद पवार जाणार नाही; चर्चांना उधाण)

एआय फॉर इंडिया 2.0 (AI) हा कार्यक्रम कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालय (MSDE), राष्ट्रीय व्यावसायिक शिक्षण आणि कौशल्य परिषद, आयआयटी मद्रास आणि आयआयएम अहमदाबाद यांनी सुरू केला आहे. एआय प्रशिक्षण कार्यक्रम हा एज्युटेक स्किल इंडिया मिशन अंतर्गत एक संयुक्त उपक्रम आहे.

तंत्रज्ञान शिक्षणातील भाषेचा अडसर दूर करून युवाशक्ती वाढवण्याच्या उद्देशाने या मोहिमेची (AI) सुरुवात झाली आहे. विशेषत: ग्रामीण भागात भविष्य सुरक्षित करण्याच्या दिशेने ही चांगली सुरुवात असल्याचे बोलले जात आहे. शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी सांगितले की, GUVI च्या माध्यमातून भारतीय भाषांमध्येही अभ्यासक्रम तयार केला जाईल. एआय प्रशिक्षण कार्यक्रम ९ भारतीय भाषांमध्ये तयार करण्यात आला आहे. ते पुढे म्हणाले की, तंत्रज्ञान शिक्षणातील भाषेतील अडथळे दूर करण्याच्या दिशेने हे मोठे पाऊल आहे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.