उपमुख्यमंत्री अजित पवार आणि त्यांचा गट पुन्हा एकदा शरद पवार यांच्या भेटीला गेला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा राजकीय वर्तुळातून चर्चेला उधाण आले आहे. पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवसाचे कामकाज तहकूब झाल्यानंतर अजित पवार शरद यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे शरद पवारांच्या भेटीसाठी गेले आहेत.
काल म्हणजेच रविवार १६ जुलै रोजी संपूर्ण अजित पवारांचा गट शरद पवारच्या भेटीसाठी सिल्वर ओक येथे गेला होता. त्यानंतर आता पुन्हा एकदा अजित पवार आणि शरद पवार यांच्यात भेट होत आहे.
देवगिरी बंगल्यावरील बैठकीनंतर अजित पवार गट शरद पवारांच्या भेटीला
देवगिरी बंगल्यावर झालेल्या बैठकीला सुनील तटकरे यांनी मार्गदर्शन केले. या बैठकीनंतर अजित पवार यांच्यासह सर्व मंत्री वाय बी चव्हाण सेंटरला पोहोचले. अजित पवार यांच्या गटाने शरद पवार यांची भेट घेतली. यात सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल, छगन भुजबळ, दिलीप वळसे-पाटील, हसन मुश्रीफ, आदिती तटकरे, धनंजय मुंडे, संजय बनसोडे आदींचा सहभाग होता. ही माहिती मिळताच जयंत पाटील आणि जितेंद्र आव्हाड देखीलही तातडीने वाय.बी. चव्हाण सेंटरवर दाखल झाले. मला सुप्रिया सुळेंचा फोन आला म्हणून मी लवकर निघालोय. शरद पवारांनी बोलवलंय, लवकर या असं मला सांगितलं, अशी प्रतिक्रिया जयंत पाटील यांनी दिली.
(हेही वाचा – Kedarnath Temple : केदारनाथ मंदिर परिसरात फोटो काढणे, व्हिडिओ बनवण्यावर बंदी)
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बंडानंतर आजपासून म्हणजेच सोमवार १७ जुलै पासून विधीमंडळाच्या पावसाळी (Legislature Monsoon Session 2023) अधिवेशनाला सुरुवात झाली. त्यामुळे आता सत्ताधारी आणि विरोधक पुन्हा आमनेसामने आले. मात्र अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी अर्ध्या तासात विधानसभा दिवसभरासाठी तहकूब करण्यात आली.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community