विरोधी पक्षांची दुसरी बैठक बंगळुरूमध्ये सुरु

जागा वाटपावर होणार चर्चा

222
विरोधी पक्षांची दुसरी बैठक बंगळुरूमध्ये सुरु

केंद्र सरकार विरोधात लढा देण्यासाठी देशभरातील छोटे मोठे पक्ष बंगळुरू येथे एकत्र येत आहेत. या विरोधकांच्या बैठकीच्या अजेंड्यामध्ये तीन प्रमुख मुद्द्यांवर चर्चा होऊ शकते. यामध्ये लोकसभा निवडणुकीत विरोधकांची एकजूट ज, गा वाटप आणि यूपीएचे नवे नाव निवडण्यावर देखील चर्चा होणार असल्याचे सूत्रांकडून समजते आहे.

सन २०२४च्या लोकसभा निवडणुकीत भाजपला पराभूत करण्यासाठी विरोधी पक्षांची दुसरी बैठक आज (१७ जुलै) बंगळुरूमध्ये सुरू होत आहे. यात २६ पक्ष सहभागी होणार असल्याचे काँग्रेसचे सरचिटणीस वेणुगोपाल यांनी सांगितले आहे.

वेणुगोपाल यांनी सांगितले की; “मंगळवारी सकाळी ११ ते दुपारी ४ या वेळेत ही बैठक होणार आहे. सोनिया आणि राहुलही येणार आहेत. सोनिया गांधी यांनी आज संध्याकाळी विरोधी पक्षांना डिनरचे निमंत्रण दिले आहे.

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जीही आज येणार आहेत. शरद पवार आज बंगळुरूला येणार नाहीत. उद्याच्या बैठकीला ते उपस्थित राहणार आहेत. पवार यांच्यासोबत सुप्रिया सुळेही येणार आहेत.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, विरोधकांच्या बैठकीच्या अजेंड्यामध्ये तीन प्रमुख मुद्द्यांवर चर्चा होऊ शकते. पहिला- लोकसभा निवडणुकीत विरोधकांची एकजूट, दुसरा मुद्दा जागा वाटप आणि तिसरा यूपीएचे नवे नाव. याशिवाय समान नागरी संहिता, मणिपूर हिंसाचार, ५ राज्यांतील विधानसभा निवडणुका, पक्ष फोडण्याची भाजपची रणनीती आणि त्याच्या काउंटर प्लॅनवरही चर्चा होणार आहे.

(हेही वाचा – Ajit Pawar group : अजित पवार पुन्हा शरद पवारांच्या भेटीला; चर्चेला उधाण)

तेलंगणाचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव, आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी, आंध्रचे माजी मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू आणि ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी या बैठकीपासून अंतर ठेवले आहे.

दुसरीकडे भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांनी १८ जुलै रोजी दिल्लीतील अशोका हॉटेलमध्ये एनडीएची बैठक बोलावली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक होणार आहे.

एनडीएच्या बैठकीबाबत काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी टीका केली आहे. “सर्व विरोधकांवर मी एकटा भारी आहे, असे मोदीजींनी राज्यसभेत म्हटल्याचे मला आश्चर्य वाटते. ते एकटेच सर्व विरोधकांवर भारी असतील तर उद्या एनडीएच्या बैठकीत ३० पक्षांना का बोलावत आहेत. किमान त्या ३० पक्षांची नावे तरी सांगा.” अशा शब्दांत त्यांनी भाजप बैठकीवर टीका केली आहे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.