मुंबईसह राज्यभर दडी मारलेला पाऊस पुन्हा सक्रिय झाला असून सोमवार, १७ जुलै रोजी पावसाने दमदार हजेरी लावली आहे. पण, येत्या तीन ते चार दिवसांत राज्यात मध्यम ते मुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.
दरम्यान, रायगड, रत्नागिरी आणि पुणे या तीन जिल्ह्यांना २१ जुलैपर्यंत मुसळधार ते अतिमुसळधार अर्थात ‘ऑरेंज’ अलर्ट जाहीर करण्यात आला आहे. तर १५ जिल्ह्यांना ‘यलो’ अलर्ट जाहीर करण्यात आला आहे. तसेच काही ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस कोसळणार असून, येत्या ४ ते ५ दिवसांत पावसाच्या संततधारेचा प्रभाव कायम राहील अशी माहिती हवामान खात्याने दिली आहे.
(हेही वाचा – दादर महात्मा गांधी जलतरण तलावांमधील महिलांच्या चेंजिंग रुमचीच दुरावस्था)
१५ जिल्ह्यांना ‘यलो’ अलर्ट
मागील काही दिवसांपासून ग्रामीण भागात दडी मारलेल्या पावसाने पुन्हा जोर धरला आहे. हवामान खात्याने १५ विभागांना ‘यलो’ अलर्ट जाहीर केला असून त्यामध्ये पालघर, ठाणे, मुंबई, सिंधुदूर्ग, जळगाव, कोल्हापूर, सातारा, औरंगाबाद, जालना, अकोला, अमरावती या जिल्ह्यांना ‘यलो’ अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर उद्या बुलढाणा, वर्धा, वाशीम आणि यवतमाळ या जिल्ह्यांचा समावेश आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community