म्हाडाच्या मुंबई गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळातर्फे काढण्यात आलेल्या ४,०८२ घरांच्या लॉटरीत नोंदणीसह अनामत रक्कम भरणारे १,२२,२६५ अर्जदार पात्र ठरले आहेत. यातील पहिल्यात फेरीत ५२७ अर्ज अपात्र ठरले आहेत तर ज्या अर्जदारांच्या कागदपत्रांबाबत म्हाडाच्या अधिकाऱ्यांना शंका येते, त्या सादर केलेल्या कागदपत्रांची संबंधित विभाग तथा खात्याकडे तपासणी करण्यात येणार आहे, असे १४,९९० अर्ज आहेत. हे अर्ज तपासणीसाठी बाजूला काढण्यात आले. त्यामुळे अपात्र आणि तपासणी करता बाजूला काढलेले अर्ज वगळता उर्वरित १,०६,७९९ स्वीकृत अर्ज संगणकीय सोडतीसाठी पात्र ठरले असल्याचे म्हाडा मुंबई मंडळाने स्पष्ट केले आहे.
मुंबईतील विविध गृहनिर्माण योजनांतर्गत अंधेरी, जुहु, गोरेगांव, कांदिवली, बोरीवली, विक्रोळी, घाटकोपर, पवई, ताडदेव, सायन, येथे उभारण्यात आलेल्या ४ हजार ८२ सदनिकांच्या विक्रीची संगणकीय सोडत प्रक्रिया अंतिम टप्प्यात असून मंडळातर्फे अर्जांची प्रारूप यादी जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये अनामत रक्कमेचा भरणा केलेल्या १,२२,२३५ अर्जांचा समावेश आहे, यापैकी ५२७ अर्ज अपात्र ठरले आहेत तर १४,९९० अर्जांची तपासणी सुरू आहे. अशाप्रकारे अद्यापपर्यंत १,०६,७९९ स्वीकृत अर्ज संगणकीय सोडतीत सहभाग घेणार आहेत.
(हेही वाचा – मुंबईत होणाऱ्या अपघातस्थळाच्या विश्लेषणासाठी वाहतूक विभागाचे विशेष पथक)
सोमवारी दुपारी सोडतीसाठी प्राप्त अर्जांची प्रारूप यादी म्हाडाच्या https://housing.mhada.gov.in अधिकृत संकेत स्थळावर प्रसिद्ध झाली असून अपात्र ठरलेल्या ५२७ अर्जदारांना १९ जुलै ,२०२३ दुपारी ०३.०० पर्यंत म्हाडाच्या संकेत स्थळावर लॉगिन करून ‘My Issue’ या मेनू मध्ये जाऊन ‘Raise Grievance’ हा पर्याय वापरुन हरकती-दावे ऑनलाइन नोंदविता येणार आहेत. यामध्यमातून त्यांना १९ जुलै, २०२३ रोजीपर्यंत पात्रता निश्चित करण्याची संधी मिळणार आहे.तसेच छाननी प्रक्रियेत असलेल्या १४,९९० अर्जांची यादी १९.७.२०२३ रोजी सायंकाळी ०६.०० वाजेपर्यंत म्हाडाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येणार आहे. या अर्जदारांनाही २१ जुलै, २०२३ रोजी दुपारी ०३.०० वाजेपर्यंत हरकती अथवा दावे सादर करून पात्रता निश्चिती करण्याची संधी उपलब्ध होणार आहे. सोडतीसाठी पात्र आणि अपात्र ठरलेल्या अर्जांची अंतिम यादी २४ जुलै, २०२३ रोजी दुपारी ०३.०० वाजता म्हाडाच्या संकेत स्थळावर प्रसिद्ध केली जाणार आहे. अशाप्रकारे अद्यापपर्यंत १,०६, ७९९ स्वीकृत अर्ज संगणकीय सोडतीत पात्र ठरले आहेत.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community