Heavy Rain : मुंबईसह उपनगरांत पावसाची दमदार हजेरी; जुलै २१ पर्यंत मुसळधार पावसाचा इशारा

कोकण विभागातील रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यात पावसाचा ऑरेंज अलर्ट

186
Heavy Rain : मुंबईसह उपनगरांत पावसाची दमदार हजेरी; जुलै २१ पर्यंत मुसळधार पावसाचा इशारा

गेल्या दोन दिवसांपासून राज्यात पुन्हा पावसाचा जोर (Heavy Rain) वाढला आहे. अशातच हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार पुढचे काही दिवस म्हणजेच जुलै २१ पर्यंत राज्यात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

आज म्हणजेच मंगळवार १८ जुलै रोजी पहाटेपासूनच मुंबईसह ठाणे, पालघर येथे मुसळधार पावसाने (Heavy Rain) हजेरी लावली आहे.

(हेही वाचा – Narendra Modi : वीर सावरकर विमानतळ टर्मिनलचे पंतप्रधान मोदी करणार उद्घाटन)

राज्यातील कोकणासह मुंबई, ठाणे परिसरात पावसानं (Heavy Rain) चांगली हजेरी लावली आहे. त्याचबरोबर नांदेड, यवतमाळ, गोंदिया जिल्ह्यात जोरदार पावसानं हजेरी लावली आहे. दरम्यान, हवामान विभागानं दिलेल्या अंदाजानुसार राज्यात पुढील चार ते पाच दिवस मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार, कोकण विभागातील रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यात पावसाचा (Heavy Rain) ऑरेंज अलर्ट जारी करण्या आला आहे. तर पश्चिम महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यात आज पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्याचबरोबर विदर्भातील काही जिल्ह्यातही आज पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. तसेच मराठवाड्याच्या काही भागासह पालघर ठाणे आणि सातारा जिल्ह्यात पावसाचा यलो अवर्ट देण्यात आला आहे.

नांदेड शहरात रात्री पासून दमदार पावसाची हजेरी

नांदेड शहरात रात्रीपासून दमदार पावसाने (Heavy Rain) हजेरी लावली आहे. नांदेड जिल्ह्यात जवळपास ६० टक्के शेतकऱ्यांनी पेरणी करुन घेतली आहे. शेतीला जसाआवश्यक आहे तसा पाऊस झाला आहे. त्यामुळं शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.