गेल्या काही दिवसांपासून (Delhi Flood) दिल्ली, उत्तर प्रदेश येथे जोरदार पाऊस पडत असून जनजीवन विस्कळीत झाले आहे. अनेक ठिकाणी ढगफुटी आणि नद्यांना पूर आले आहे. दरम्यान, मुसळधार पावसामुळं दिल्लीत यमुना नदीच्या पाणी पातळीत पुन्हा एकदा वाढ झाली आहे. त्यामुळे यमुना नदीनं धोक्याची पातळी ओलांडली आहे. त्यामुळं नागरिकांनी खबरदारी घ्यावी असं आवाहन प्रशासनाच्या वतीनं करण्यात आलं आहे. दरम्यान, पुरामुळं (Delhi Flood) दिल्लीत आजारांचा धोका वाढला आहे.
(हेही वाचा – Monsoon Session 2023 : मुख्यमंत्र्यांकडील अतिरिक्त खात्याची जबाबदारी अन्य मंत्र्यांवर)
दिल्ली प्रशासन सतर्क
दिल्लीतील पुराचा (Delhi Flood) सर्वाधिक फटका पूर्व दिल्ली आणि ईशान्य दिल्लीला बसला आहे. पूर आणि पावसामुळे डेंग्यू, मलेरिया यांसारख्या आजारांचा धोका वाढला आहे. सध्या त्याचा प्रभाव दिसत नसला तरी दिल्ली सरकारने या आजारांना तोंड देण्यासाठी तयारी सुरू केली आहे.
यमुना नदीची पाणीपातळी २०६ मीटरवर
सोमवारी (१७ जुलै) सकाळी ११ वाजता यमुनेची (Delhi Flood) पाण्याची पातळी २०५.७६ मीटर होती. सायंकाळी ५ वाजता २०५.९३ मीटर एवढी नोंद झाली. सोमवारी रात्री १० वाजेपर्यंत यमुना नदीची पाणीपातळी २०६ मीटरवर पोहोचली. जुना रेल्वे पूल (ORB) येथे यमुना नदीची जलपातळी १२ वाजता २०५.७५ मीटर नोंदवण्यात आली आहे. जी धोक्याच्या चिन्हाच्या वर आहे. दिल्ली सरकारमधील मंत्री आतिशी यांनी ट्विट केले की, “काल हरियाणातील काही भागात झालेल्या मुसळधार पावसामुळे आज यमुनेच्या पाण्याची पातळी थोडीशी वाढत आहे. जोपर्यंत पाण्याची पातळी धोक्याच्या चिन्हापेक्षा खाली येत नाही तोपर्यंत मदत शिबिरांमध्ये राहणाऱ्या लोकांना घरी न परतण्याचे आवाहन केले. दिल्लीला लागून असलेल्या हरियाणातील फरिदाबादमध्ये गेल्या दोन दिवसांत वेगवेगळ्या घटनांमध्ये बुडून चार जणांचा मृत्यू झाला आहे. रविवारी संध्याकाळी तीन मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. तर सोमवारी पूरग्रस्त यमुनेतून एक मृतदेह बाहेर काढण्यात आला.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community