Veer Savarkar : पोर्ट ब्लेअरमधील वीर सावरकर आंतरराष्ट्रीय विमानतळाचे पंतप्रधान मोदींच्या हस्ते झाले उद्घाटन

259

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी, १८ जुलै रोजी पोर्ट ब्लेअरमधील वीर सावरकर आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या नवीन टर्मिनलचे व्हर्च्युअल उद्घाटन केले. त्यावेळी केंद्रीय विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया विमानतळावर उपस्थित होते.

port blair2

शंखाचा आकार दिला विमानतळाला 

अहवालानुसार नवीन टर्मिनलची रचना निसर्गापासून प्रेरित आहे, जी डिझाइनमध्ये समुद्र आणि बेटांचे चित्रण करणाऱ्या शंख-आकाराच्या संरचनेसारखे आहे.

port blair

(हेही वाचा Narendra Modi : वीर सावरकर विमानतळ टर्मिनलचे पंतप्रधान मोदी करणार उद्घाटन)

नवीन टर्मिनल 40,800 चौरस मीटरवर बांधले

हे टर्मिनल अंदाजे 40,800 चौरस मीटरमध्ये बांधले आहे. ते वर्षाला सुमारे 50 लाख प्रवाशांना हाताळण्यास सक्षम आहे. संपूर्ण टर्मिनलमध्ये दिवसाचे 12 तास 100 टक्के नैसर्गिक प्रकाश असेल छतावरील स्कायलाइटद्वारे प्रदान केले जाईल. इमारतीमध्ये 28 चेक-इन काउंटर, तीन पॅसेंजर बोर्डिंग ब्रिज आणि चार कन्व्हेयर बेल्ट आहेत.

port blair1

10 विमान पार्किंगची क्षमता

पोर्ट ब्लेअर विमानतळावर 80 कोटी रुपये खर्चून दोन बोईंग-767-400 आणि दोन एअरबस-321 विमानांसाठी पार्किंग क्षेत्र बांधण्यात आले आहे. यामुळे विमानतळावर आता एकावेळी 10 प्लेन पार्क होऊ शकतात.

port blair3

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.