Mission 2024 : विरोधी पक्षांच्या आघाडीचे नाव ‘इंडिया,’; २६ पक्षांनी मिळून पारित केला प्रस्ताव

246
Mission 2024 : विरोधी पक्षांच्या आघाडीचे नाव 'इंडिया,'; २६ पक्षांनी मिळून पारित केला प्रस्ताव
Mission 2024 : विरोधी पक्षांच्या आघाडीचे नाव 'इंडिया,'; २६ पक्षांनी मिळून पारित केला प्रस्ताव

सन २०२४ च्या सार्वत्रिक निवडणुकीत भाजपचा पराभव करण्यासाठी विरोधात २६ पक्ष एकत्र आले आहेत. बंगळुरूमध्ये विरोधी पक्षांच्या ऐक्याची दुसऱ्या दिवशीची बैठक सुरू आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या बैठकीत विरोधी पक्षांच्या आघाडीला इंडिया असे नाव देण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला आहे.

या बैठकीला उपस्थित असलेल्या राष्ट्रीय जनता दलानेही विरोधी पक्षांची आघाडी हे भारताचे प्रतिबिंब असल्याचे ट्विट केले आहे. राजदने भारताचे पूर्ण रूप सांगितले, INDIA (इंडिया) म्हणजेच भारतीय राष्ट्रीय लोकशाही सर्वसमावेशक आघाडी. RJD (आरजेडी) ने यासोबत लिहिले, आता पंतप्रधान मोदींना INDIA (इंडिया) म्हणतानाही त्रास होईल.

(हेही वाचा – मंत्रालयातील एका सहीमुळे रखडला वांद्रे पश्चिम रेक्लमेशनचा विकास – आशिष शेलार)

दुसरीकडे, काँग्रेस खासदार मणिकम टागोर यांनी लिहिले, चक दे इंडिया. मात्र या नावाबाबत अद्याप कोणतेही अधिकृत वक्तव्य जारी करण्यात आलेले नाही. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार चार्टर विमानाने बंगळुरूला पोहोचले होते. कर्नाटकच्या मंत्र्यांनी त्यांचे स्वागत केले. या बैठकीमध्ये अनेक महत्वाचे निर्णय घेण्यात येणार आहे. सर्वात महत्वाचा विषय जागा वाटपाचा असेल. तर विरोधी पक्षाचे नेतृत्व कुणाकडे असेल हे देखील ठरणार आहे. शिवाय भारतीय जनता पक्षाविरोधात रणनीती तयार करण्यात आली. विशेष म्हणजे मोदींना कसे हरवायचे यावर दिवसभर मंथन करण्यात आले आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.