UN : संयुक्त राष्ट्राने भारताला परत केल्या १०५ पुरातन कलाकृती

188

अमेरिकेने सोमवारी न्यूयॉर्कमधील भारतीय, प्रत्यावर्तन समारंभात १०५ तस्करी केलेल्या पुरातन वस्तू भारताला परत केल्या. पुरातन वस्तू लवकरच भारतात आणल्या जातील, असे इंडियन कॉन्सुलेट म्हटले आहे.

यापूर्वी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या २०१६च्या युनायटेड स्टेट्स दौऱ्यादरम्यान, १६ पुरातन वास्तू अमेरिकेने परत केल्या होत्या आणि आता २०२१ मध्ये, अमेरिकेने १५७ कलाकृत्या परत केल्या. २०१६ पासून आतापर्यंत अमेरिकेने एकूण २७८ कलाकृत्या भारताला परत केल्या आहेत.

(हेही वाचा Maharashtra : महाराष्ट्र राज्यात फक्त 2.44 लाख पदे रिक्त; मागील 30 महिन्यांपासून भरले नाही एकही पद)

एकूण प्राचीन वस्तूंपैकी सुमारे ५० हिंदू, जैन आणि इस्लाम या धार्मिक विषयांशी संबंधित प्राचीन वस्तूं आहेत, तर उर्वरित सांस्कृतिक महत्त्वाच्या आहेत. एका सरकारी अहवालानुसार, पूर्व भारतातील ४७, दक्षिण भारतातील २७, मध्य भारतातील २२, उत्तर भारतातील सहा आणि पश्चिम भारतातील कलाकृत्या आहेत.

या बॅचचा भाग म्हणून परत येण्याच्या वस्तू पहिले शतक ते पंद्राव्या शतकापर्यंतच्या आहेत, असे अधिकारी म्हणाले. यामध्ये इ.स.पूर्व पहिल्या शतकातील “टेराकोटा यक्ष फलक” समाविष्ट आहे, जे ‘पूर्व भारतातून’ चोरीला गेले होते; नव्या शतकातील एक ‘लाल वाळूचा खडक,’ ‘नृत्य गणेशा’; दहाव्या शतकातील ‘कुबेर’, आणि इतर अनेक मौल्यवान पुरातन वस्तू आणि संगमरवरीच्याही काही वस्तूंचा समावेश आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.