Tata Hospital : टाटा रुग्णालयातील धक्कादायक प्रकार; रुग्णांना खाजगी लॅबमध्ये पाठवणाऱ्या रॅकेटमधील अकरा जणांना अटक

329

कर्करोग रुग्णाच्या तपासण्या करण्यासाठी रुग्णालयात सर्व यंत्रणा उपलब्ध असतांना रुग्णांना खाजगी लॅबकडे पाठवून कमिशन मिळवणारे टाटा रुग्णालयातील रॅकेटचा पर्दाफाश करण्यात आला आहे. परळच्या भोईवाडा पोलीस ठाण्यात या प्रकरणी रुग्णालयातील कर्मचाऱ्यांसह २४ जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला असून ११ जणांना अटक करण्यात आल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे.

कर्करोगावर उपचार करणारे देशातील सर्वात मोठे रुग्णालय म्हणून मुंबईतील टाटा मेमोरियल रुग्णालय ओळखले जाते. या रुग्णालयात देशाच्या कानाकोपऱ्यातून कर्करोग झालेले रुग्ण उपचारासाठी येतात. दररोज शेकडोंच्या संख्येने या ठिकाणी रुग्ण येत असतात, या ठिकाणी या रोगावर वेगवेगळ्या चाचण्या करण्यासाठी रुग्णालयात सर्व यंत्रणा असताना केवळ थोड्या कमिशनसाठी रुग्णांना चाचण्या करण्यासाठी खाजगी लॅबमध्ये पाठवले जात होते.

(हेही वाचा Veer Savarkar : पोर्ट ब्लेअरमधील वीर सावरकर आंतरराष्ट्रीय विमानतळाचे पंतप्रधान मोदींच्या हस्ते झाले उद्घाटन

रुग्णालयातील कर्मचाऱ्यां)ची एक टोळी खाजगी लॅबच्या मालक आणि व्यवस्थापकांना हाताशी धरून प्रत्येक रुग्णांना तपासण्या (चाचण्या) करण्यासाठी खाजगी लॅबला पाठवत होते, खासगी लॅबवाले गोरगरीब रुग्णांकडून तपासण्यासाठी मोठ्या रकमा उकळत होते, त्यातील मोठे कमिशन कर्मचारी टोळीला मिळत होते. गोरगरीब रुग्ण मोठ्या आशेने या रुग्णालयात येतात आणि येथील कर्मचारी या रुग्णांना यंत्रणा बंद असल्याचे सांगून डॉक्टरांनी दिलेल्या टेस्ट (चाचण्या) करण्यासाठी खाजगी लॅबमध्ये पाठवत होते.

या रॅकेटमध्ये खाजगी इन्फिनिटी सेंटरचे व्यवस्थापक संजय सोनवणे व मालक तसेच इतर डायग्नोस्टिक सेंटर चालविणाऱ्यांचा सहभाग असून २४ ते २५ जणांच्या या रॅकेटमध्ये रुग्णालयातील कर्मचारी आहे. रुग्णालय प्रशासनाकडे याबाबत अनेक रुग्णांच्या तक्रारी आल्यानंतर या रॅकेटचा पर्दाफाश करण्यात आला. याप्रकरणी रुग्णालय प्रशासनाने भोईवाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. याप्रकरणी पोलिसांनी २० जणांविरुद्ध भा.द.वी.कलम ४०६, ४०९, ४२०, १२० (ब) गुन्हा दाखल केला असून ११ जणांना अटक करण्यात आली आहे. अटक करण्यात आलेल्यांमध्ये इन्फिनिटी सेंटरचे व्यवस्थापक संजय सोनवणे यांचा समावेश आहे.

एका गुप्त माहितीच्या आधारे, टाटा मेमोरियल हॉस्पिटलमधील सुरक्षा विभागाने, मुंबई पोलिसांच्या मदतीने रूग्णांना कमिशनसाठी बाहेरील इमेजिंग सेंटरमध्ये पाठवण्यात गुंतलेल्या हॉस्पिटलच्या काही कर्मचाऱ्यांना पकडले. परळ येथील डायग्नोस्टिक सेंटरच्या प्रतिनिधीकडून पैसे वसूल करताना दोन कर्मचाऱ्यांना रंगेहात पकडण्यात आले.  इतर कर्मचाऱ्यांचाही यात समावेश आहे का, याचा तपास सुरू आहे.  डॉक्टर सी एस प्रमेश यांच्याशी संपर्क साधला असता, संचालक म्हणाले, “टाटा मेमोरियल हॉस्पिटलमध्ये, आमच्याकडे रूग्णालयातील कॅन्सर केअरच्या नीतिनियमांविरुद्ध काम करणार्‍या कर्मचार्‍यांच्या विरोधात कठोरपणे वागण्याची मर्यादा खूप कमी आहे.  ते पुढे म्हणाले की प्रशासनाने वेगाने आणि निर्णायकपणे काम केले आणि त्यांनी पुढील तपासासाठी हे प्रकरण पोलिसांकडे सोपवले आहे.  संबंधित कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले असून, आरोप सिद्ध झाल्यास त्यांना बडतर्फ करण्यात येईल.”

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.