Epidemic : मुंबईत वाढते गॅस्ट्रो, मलेरिया आणि डेंग्यूची साथ साथीचे आजार

ही वाढती रुग्णसंख्या मुंबईच्या चिंतेत भर पाडणारी आहे.

247
Epidemic : मुंबईत वाढते गॅस्ट्रो, मलेरिया आणि डेंग्यूची साथ साथीचे आजार

मुंबईत साथीच्या (Epidemic) आजारांच्या रुग्ण संख्येत वाढ होत असून गॅस्ट्रो, मलेरिया आणि डेंग्यूच्या रुग्णसंख्येमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ दिसून येत आहे. मात्र या बाधित रुग्णांना बाह्यरुग्ण विभागामार्फत उपचार दिले जात असल्याचा दावा महापालिका प्रशासनाने केला असला तरी ही वाढती रुग्णसंख्या मुंबईच्या चिंतेत भर पाडणारी आहे.

या जुलै महिन्यातील मागील १५ दिवसांमध्ये एकूण ३५५ रुग्ण (Epidemic) आढळून आले तर जून महिन्यांत हिवतापाचे ६७६ रुग्ण आढळून आले होते. जुलै २०२२ मध्ये हिवतापाचे ५६३ रुग्ण आढळून आले होते. मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी जून आणि जुलैच्या १५ दिवसांमध्ये ही संख्या वाढलेली पहायला मिळते. तर डेंग्यूच्या रुग्ण संख्येतही वाढ दिसून येत असून या १५ दिवसांमध्ये २६४ रुग्ण आढळून आले. मागील वर्षी जुलै महिन्यांत डेंग्यूच्या ६१ रुग्ण होते, तर मागील जून महिन्यांत डेंग्यूचे ३५३ रुग्ण होते. त्यामुळे जून महिन्यात वाढलेली आणि या १५ दिवसांत वाढलेली संख्या पाहता मुंबईकरांना डेंग्यूच्या आजाराचा धोका दिसून येत आहे. त्यामुळे या वाढत्या डेंग्यूच्या आजाराकरता लक्षणे दिसल्यास त्वरित डॉक्टरी सल्ल्याने औषधोपचार करावा.

(हेही वाचा – Landslide : प्रवास करतांना जरा जपून; आंबेनळी घाटात सलग दोनवेळा दरड कोसळल्याने रस्ता वाहतुकीसाठी बंद)

ताप, डोकेदुखी, पुरळ,स्नायू आणि सांधेदुखी, उलट्या किंवा जुलाब असल्यास स्वतः औषधोपचार घेऊ नका आणि ताबडतोब आपल्या जवळच्या मनापा आरोग्य केंद्र दवाखाना रुग्णालयात जाऊन डॉक्टरांच्या (Epidemic) सल्ल्यानेच औषधोपचार करावा. या उपचारास उशीर झाल्यास गुंतागुंत होऊ शकते आणि मृत्यूही होऊ शकतो, अशी भीती आरोग्य विभागाने व्यक्त करत हे आवाहन केले आहे.

तर ग्रॅस्ट्रोच्या आजाराचे (Epidemic) मागील १५ दिवसांमध्येच ९३२ रुग्ण आढळून आले आहेत. तर मागील जून महिन्यांत १७४४ रुग्ण होते, त्यामुळे मागील महिन्याच्या विचार करता निम्या पेक्षा अधिक ग्रॅस्ट्रोचे रुग्ण दिसून आले आहे. तर हेपेटायटीस या रुग्णातही वाढ आढळून आली असून मागील महिन्याप्रमाणेच ही वाढ असल्याचे दिसून येत आहे. मागील जून महिन्यांत १४१ रुग्ण होते तर या १५ दिवसांत ७६ रुग्ण आढळून आले आहेत.त्यामुळे पाणी उकळून प्यावे, खूप प्रमाणात पाणी प्या. रस्त्यावरच्या उघड्या झाकून न ठेवलेल्या पदार्थाचे सेवन करणे टाळणे आणि खाण्यापूर्वी स्वच्छ हात धुणे किंवा सॅनिटायझरचा वापर करावा असे आवाहन सार्वजनिक आरोग्य विभागाने केले आहे.

मागील १५ दिवसांमधील रुग्णांची आकडेवारी

हिवताप : ३५५ ( जून २३- रुग्ण६७६)

लेप्टो : १०४ (जून २३- रुग्ण ९७)

डेंग्यू : २६४ (जून २३- रुग्ण ३५३ )

ग्रॅस्ट्रो : ९३२(जून २३- रुग्ण १७४४ )

हेपेटायटीस : ७६(जून २३- रुग्ण १४१)

चिकन गुनिया : १० (जून २३- रुग्ण ०८)

एच१एन१ : ५२ (जून २३- रुग्ण ९०)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.