Heavy Rain : पावसामुळे दक्षिण मुंबईतील वाहतूक मंदावली…

विधानभवनात मंत्री, कार्यालय कर्मचारी देखील पोहचले उशिरा.

207
Heavy Rain : पावसामुळे दक्षिण मुंबईतील वाहतूक मंदावली...

सततच्या पावसामुळे (Heavy Rain) दक्षिण मुंबईतील वाहतूक मंदावली आहे. मुंबईमध्ये पावसाळी अधिवेशनाचा आज (बुधवार, १९ जुलै) तिसरा दिवस आहे. मात्र मुसळधार पावसामुळे अधिवेशनात पोहोचणाऱ्यांची मोठ्या प्रमाणात अडचण होत आहे. सकाळी ११ वाजता अधिवेशनाला सुरुवात होणार आहे मात्र त्याआधी मंत्री कार्यालयातील कर्मचारी पावसामुळे वेळेत पोहोचू शकलेले नसल्याचे निदर्शनास येत आहे.

(हेही वाचा – Landslide : प्रवास करतांना जरा जपून; आंबेनळी घाटात सलग दोनवेळा दरड कोसळल्याने रस्ता वाहतुकीसाठी बंद)

सकाळी अकरा वाजता अधिवेशनाला सुरुवात होणार असेल तर किमान एक तास आधी मंत्र्यांना ब्रीफिंग देण्यासाठी अधिकारी वर्ग विधान भवन परिसरात पोहोचत असतो, परंतु सकाळपासून होत असलेल्या पावसामुळे (Heavy Rain) त्यांना पोहोचण्यासाठी देखील आज उशीर झालेला दिसून येत आहे. हिंदुस्तान पोस्टच्या प्रतिनिधीने सर्व मंत्री कार्यालयात फिरून पाहणी केली असता, बराच कर्मचारी वर्ग अजूनही पोहचला नसल्याचे दिसून आले.

मुंबईला आज ऑरेंज अलर्ट

आज पहाटेपासूनच मुंबईसह उपनगरांत जोरदार पाऊस (Heavy Rain) कोसळत असून मुंबई शहराला ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तसेच पुढील दोन दिवसांसाठी १०० मिमीहून अधिक पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर तळ कोकणात देखील अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला असून सोबतच मध्य महाराष्ट्रातील घाट माथ्यावर काही ठिकाणी अतिवृष्टीची शक्यता आहे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.