वंदना बर्वे
राज्यात नव्यानेच मंत्रिमंडळात स्थान मिळावलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटासोबत पंतप्रधान मोदी आणि अमित शाह यांनी मध्यरात्री उशिरापर्यंत चर्चा केली. बैठकीचा फारसा तपशील मिळू शकला नसला तरी राज्यातील राजकारणावर तसेच आगामी निवडणूका संदर्भात चर्चा झाल्याचे समजते. शिवाय उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लोकसभा निवडणूक सोबत लढणार असल्याचा विश्वास भाजपला दिला असल्याचे समजते. अजित पवारांनी लोकसभा निवडणुकीतही एकत्र राहण्याचा निर्धार व्यक्त केला. महाराष्ट्रात लोकसभेच्या ४८ जागा आहेत.
महाराष्ट्रासह देशाच्या राजकारणात सातत्याने मोठ्या घडामोडी घडत आहेत. राजधानी दिल्लीत काल भाजपप्रणित एनडीएची महत्त्वपूर्ण बैठक झाली. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा व भाजपध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांशी सल्लामसलत केली. त्यांच्यात जवळपास ३० मिनिटे चर्चा झाली. या चर्चेचा तपशील अद्याप स्पष्ट झाला नाही. पण ही चर्चा राज्यातील विद्यमान घटनाक्रमाभोवती फिरत असल्याचा अंदाज आहे.
दुसरीकडे, राष्ट्रवादीच्या नेत्यांनंतर शहा व नड्डा यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांच्याशी बंद दरवाज्याआड चर्चा केल्याची माहिती सूत्रांनी दिली. या बैठकीसाठी शिंदे व पवार दिल्लीतच होते. त्यानंतर रात्री उशिरा फडणवीस दिल्लीत पोहोचले. त्यानंतर त्यांनी भाजपश्रेष्ठींशी संवाद साधला. या बैठकीत शहांनी महाराष्ट्रातील विद्यमान घटनाक्रमाचा आढावा घेतला. तसेच तिन्ही पक्षांमध्ये योग्य तो समन्वय साधण्याचेही निर्देश दिले. दिल्लीत मंगळवारी सत्ताधारी भाजपने एनडीएची बैठक बोलावण्यात आली होती. या बैठकीला राष्ट्रवादीसह जवळपास ३८ पक्षांचे नेते उपस्थित होते.
(हेही वाचा – Abu Azmi : वंदे मातरम् म्हणण्यास अबू आझमींचा नकार; विधानसभेत गोंधळ)
या बैठकीसाठी शिवसेनेतर्फे (शिंदे गट) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, तर राष्ट्रवादीकडून (अजित पवार गट) स्वतः उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित होते. या बैठकीत शिंदे व पवार यांना पंतप्रधान मोदी व गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबत पहिल्या रांगेत बसवण्यात आले. शहा व शिंदे एका बाजूला होते. शिंदेंच्या बाजूला नड्डा व त्यांच्या बाजूला मोदी बसले होते. महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीत एनडीएच्या ४५ जागा निवडून येतील, असा विश्वास मुख्यमंत्री शिंदे यांनी एनडीएच्या बैठकीत व्यक्त केला. तर अजित पवारांनी लोकसभा निवडणुकीतही एकत्र राहण्याचा निर्धार व्यक्त केला. महाराष्ट्रात लोकसभेच्या ४८ जागा आहेत.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community