मार्सेलिसमधील नवीन दूतावासात स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे म्युरल स्थापन करावे, अशी मागणी स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकातर्फे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे करण्यात आली आहे. या म्युरलसाठी महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष म्हणून आपण पाठपुरावा करावा, अशी विनंती वीर सावरकरांचे नातू आणि स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे कार्याध्यक्ष रणजित सावरकर यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना केली आहे.
यासंदर्भात विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना लिहिलेल्या पत्रात रणजित सावरकर म्हणतात, मार्सेलिसमध्ये स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी ८ जुलै १९१० ला मोरिया या नौकेतून मारलेल्या ऐतिहासिक उडीचे स्मारक तिथे व्हावे यासाठी स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक करत असलेल्या प्रयत्नांना प्रतिसाद देत या कामासाठी आपण स्वतः सक्रीय आहात. हे स्मारक लवकरच पूर्ण होईल, असा मला पूर्ण विश्वास आहे. परंतु, मार्सेलिसमध्ये भारताचा नवीन दूतावास सुरु होत असल्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतीच त्यांच्या फ्रांस दौऱ्यात केली आहे. या दुतावासातदेखील स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या ऐतिहासिक उडीचे म्युरल निर्माण व्हावे, अशी विनंती स्मारकाने पंतप्रधान मोदी यांना केली आहे. आपण या कार्यासाठीदेखील पाठपुरावा करून हे कार्य पूर्णत्वाला न्याल असा मला पूर्ण विश्वास आहे, असे रणजित सावरकर यांनी पत्रात लिहिले आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community