Aditi Tatkare : कोकणातील पूरस्थिती हाताळण्यासाठी राज्य सरकारची यंत्रणा सज्ज – अदिती तटकरे

141
Aditi Tatkare : कोकणातील पूरस्थिती हाताळण्यासाठी राज्यसरकारची यंत्रणा सज्ज - अदिती तटकरे
Aditi Tatkare : कोकणातील पूरस्थिती हाताळण्यासाठी राज्यसरकारची यंत्रणा सज्ज - अदिती तटकरे

कोकणाला बुधवारी रेड अलर्ट असला, तरी हवामान खात्याने गुरुवारी ‘ऑरेंज अलर्ट’ जाहीर केला आहे. त्यामुळे पाऊस कमी होईल, मात्र तरीही एनडीआरएफच्या टीम, स्थानिक रेस्क्यू टीम तैनात ठेवण्यात आल्या आहेत. रेस्क्यू करण्याची वेळ जरी आली तरी पुरेशी व्यवस्था तैनात आहे, असा विश्वास महिला व बालविकास मंत्री आणि रायगड जिल्ह्याच्या माजी पालकमंत्री अदिती तटकरे यांनी रायगडवासियांना दिला आहे.

मुसळधार पावसामुळे रायगड जिल्ह्यात परिस्थिती बिकट झाली असून इथल्या परिस्थितीवर लक्ष ठेवून नागरिकांची योग्य ती खबरदारी घेतली जात आहे. रायगड जिल्ह्यात मुसळधार पावसाच्या शक्यतेनुसार मंगळवारीच शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली असल्याचे अदिती तटकरे यांनी सांगितले.

महाड, पोलादपूर, माणगाव परिसरात एनडीआरएफची पथके दोन दिवसापासून तैनात करण्यात आली आहेत. ज्या – ज्या गावात पाणी भरले आहे त्या ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालयाकडून संपर्क झाला आहे. पाताळगंगा, सावित्री आणि आंबा या तीन नद्यांनी धोक्याची पातळी गाठली आहे तर कुंडलिका नदीने अद्याप धोक्याची पातळी गाठलेली नाही. पण महाड शहरात काही प्रमाणात पाणी भरलेले आहे. ते पाणी लवकरच ओसरेल अशी माहिती जिल्हाधिकारी कार्यालयाने दिली आहे. सरकारकडून जी खबरदारी घ्यायची आहे ती घेण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे, असेही अदिती तटकरे यांनी स्पष्ट केले.

(हेही वाचा – AC Sleeper Coach : रेल्वेच्या एसी, स्लीपर कोचमध्ये झोपण्याच्या वेळेत बदल; जाणून घ्या नवीन नियम)

घाट रस्ता वाहतूकीसाठी बंद

  • जिल्ह्यातील तहसीलदार व प्रांत कार्यालयाकडून माहिती दिली जात आहे. २०२१ मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे जी परिस्थिती निर्माण झाली होती त्या परिस्थितीनुसार ज्या उपाययोजना करण्यात आल्या होत्या, त्याप्रमाणे उपाययोजना इथे केल्या जात आहेत. आम्ही वेळोवेळी नागरिकांशी, यंत्रणेच्या संपर्कात आहोत.
  • पोलादपूरपासून महाबळेश्वर घाट रस्ता वाहतूकीसाठी बंद आहे. ज्या पुलावरून पाणी जात आहे त्यामध्ये म्हसळा, माणगाव, महाड, अलीबाग, पेण, उरण येथील रस्ते वाहतूकीसाठी बंद करण्यात आले आहे. आम्ही सगळ्या परिस्थितीवर लक्ष ठेवून आहोत असेही अदिती तटकरे यांनी सांगितले.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.