आज (१९ जुलै) पहाटेपासून सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे (Heavy Rain) मध्य रेल्वेची सेवा विस्कळीत झाली. अंबरनाथ लोकल ठाकुर्ली आणि कल्याण या दरम्यान सुमारे २ तास थांबली होती. त्यामुळे अनेक प्रवासी कल्याणच्या दिशेने पायी चालू लागले. यादरम्यान एक दुर्दैवी घटना घडली.
(हेही वाचा – Heavy Rain : मध्य रेल्वेची सेवा फक्त डोंबिवलीपर्यंत तर मुंबई-पुणे दरम्यान १० रेल्वे रद्द)
या पायी चालणाऱ्या प्रवाश्यांमध्ये एक स्त्री आपल्या चार महिन्याची मुलगी आणि आपल्या वडिलांसोबत होती. ती चार महिन्याची मुलगी महिलेच्या वडिलांजवळ होती. मात्र अचानक त्या वडिलांच्या हातून चार महिनाचे ते बाळ सटकले आणि वाहत्या पाण्यात वाहून गेले.
आता थोडा वेळे पुर्वी अंबरनाथ लोकल ठाकुल्री आणि कल्याण या दरम्यान सुमारे २ तास उभी असताना काही प्रवाशी उतरून कल्याण च्या दिशेने चालत होते त्यात एक छोटा बाळ घेऊन एक काका आणि त्या बाळाची आई पण चालत होते अचानक त्या काका च्या हातून चार महिनाचा बाळ हातातून सटकला आणि त्या वाहत्या… pic.twitter.com/QmsfGc58Lc
— Binu Varghese✍🏻 (@SabSeTezz1) July 19, 2023
योगिता रुमाले (वय २५) असे या महिलेचे नाव असून भिवंडी येथे राहणारी आहे. योगिता आणि तिचे वडील नाल्याजवळून जात असताना तिथली वाट निमुळती असल्यामुळे वडिलांचा पाय त्या नाल्याजवळ अडकला आणि त्यांच्या हातातील ४ महिन्याची मुलगी हातातून निसटुन वाहत्या नाल्यात पडली. मिळालेल्या माहितीनुसार हा नाला कल्याण खाडीला जाऊन मिळतो. त्यामुळे आता कल्याण रेल्वे पोलीस आणि रेस्क्यू टीम घटनास्थळी दाखल झाली असून मुलीचा शोध घेण्यात येत आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community