स्त्रिया आपल्या हातांचे सौंदर्य वाढवण्यासाठी वेगवेगळ्या रंगांच्या नेलपॉलिशने नखे सजवतात. अनेकवेळा स्त्रियांची तक्रार असते की, त्यांची नवीन नेलपॉलिश देखील कोरडी पडू लागते. नेलपॉलिश कोरडी पडण्याची अनेक कारणे आहेत. अनेकवेळा वाळलेल्या नेलपॉलिश फेकून दिल्या जातात. नेलपॉलिशच्या अयोग्य वापरामुळे त्या कोरड्या पडू लागतात. अशावेळी वाळलेल्या नेलपॉलिश फेकून दिल्या जातात. असे करत असाल तर थांबा. नेलपॉलिश कोरड्या पडण्यापासून रोखण्यासाठी आम्ही काही सोपे उपाय सांगणार आहोत.
नेलपॉलिश वापरण्याची योग्य पद्धत जाणून घ्या…
१. पंखा बंद ठेवा : जेव्हाही तुम्ही नेलपॉलिशचा वापर करत असाल तेव्हा पंखा, एसी नेहमी बंद ठेवा. नेल पॉलिशमध्ये हवा गेल्यास ती कोरडी पडू लागते.
२. व्यवस्थित बंद करा : नेल पॉलिश लावल्यानंतर नेलपॉलिशचे झाकण व्यवस्थित बंद करा. नेलपॉलिशच्या बाटलीचे झाकण उघडे राहिल्यास ती कोरडी पडण्याची शक्यता जास्त असते.
३. सामान्य तापमानात ठेवा : नेलपॉलिश नेहमी सामान्य तापमानात ठेवा. नेलपॉलिश बॉक्समध्ये किंवा फ्रिजमध्ये ठेवल्यास ती कडक होऊ लागते.
(हेही वाचा – Marathwada : ‘मागासलेला’ शब्दापासून मराठवाड्याची मुक्ती करू; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची विधानसभेत ग्वाही)
वाळलेल्या नेलपॉलिशचे काय करावे?
नेलपॉलिश कोरडी पडली असल्यास, कोमट पाण्यात घाला आणि १५ ते २० मिनिटे तसेच ठेवा. असे केल्याने, कडक झालेली नेलपॉलिश मऊ पडू लागेल. नेलपॉलिश पाण्यातून काढल्यानंतर ती चांगली मिसळा. याव्यतिरिक्त, तुम्ही नेलपॉलिश थिनर देखील वापरू शकता. यासाठी नेलपॉलिशच्या बाटलीत थिनरचे ४ ते ५ थेंब टाका आणि नंतर ते चांगले मिसळा. थिनरमुळे नेलपॉलिश पातळ होऊ लागते.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community