मुंबईत टप्पा ११ अंतर्गत बांधण्यात आलेल्या २२ हजार सार्वजनिक शौचालयांच्या उभारणीनंतर टप्पा १२ अंतर्गत मागण्यात आलेली निविदा प्रक्रियाच आता रद्द करण्याच्या हालचाली सुरु झाल्या आहेत. आजवर बांधण्यात आलेल्या शौचालयांची कामे निकृष्ट दर्जाची होत असल्याने या कामांबाबत सरकार असमाधानी असल्याने त्यांनी या शौचालयांची बांधणी कॉर्पोरेट कंपन्यांमार्फत करून घेण्याची सूचना केली आहे. त्यानुसार या शौचालयांची उभारणी कॉर्पोरेट कंपन्यांमार्फत करून घेण्यासाठी अंतिम टप्प्यात आलेली ही निविदाच रद्द करण्याचा निर्णय घेतला असून त्यादृष्टीकोनातून याच्या हालचाली सुरु असल्याची माहिती मिळत आहे.
मुंबई महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या माध्यमातून टप्पा १२ अंतर्गत १४ हजार सार्वजनिक शौचालयांची बांधकाम करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार महापालिकेच्या वतीने २४ विभाग कार्यालयांच्या हद्दीमध्ये २८ भागांमध्ये विभागून निविदा मागवण्यात आली. सुमारे ५०० कोटी रुपयांच्या या कंत्राट कामांच्या निविदा प्रक्रिया पूर्ण झाल्यानंत आता या शौचालयांची उभारणी कॉर्पोरेट कंपन्यांकडून करून घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे ज्या प्रकारे रस्ते कंत्राट कामात प्रस्थापित कंपन्यांना बाजूला करत मोठ्या कंत्राटदारांना महापालिकेच्या विकास प्रकल्पांच्या कामांमध्ये सहभागी करून घेण्याचा प्रयत्न झाला, त्याचप्रमाणे आता शौचालयांच्या कामांमध्येही अशा प्रस्थापित कंत्राटदारांना बाजुला करून कॉर्पोरेट कंपन्यांमार्फत उत्तम दर्जाचे काम करून घेण्याचा प्रयत्न केला जात आहे.
(हेही वाचा – Marathwada : ‘मागासलेला’ शब्दापासून मराठवाड्याची मुक्ती करू; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची विधानसभेत ग्वाही)
सरकारमधील मुख्यमंत्री आणि पालकमंत्र्यांनी सध्याच्या सार्वजनिक शौचालयांच्या कामांबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. आजवर केलेल्या सार्वजनिक शौचालयांच्या कामांचा दर्जा निकृष्ट असल्याने कॉर्पोरेट कंपन्यांकडून ही कामे करून घेण्याचा सूचना सरकारमधील मंत्र्यांकडून प्राप्त झाल्याने महापालिका प्रशासनाने या सार्वजनिक शौचालयांसाठी राबवलेली निविदा प्रक्रिया स्थगित ठेवली आहे. ही निविदा प्रक्रिया स्थगित ठेवलेली असतानाच ही निविदाच आता रद्द करण्याचा निर्णय घेतला असून त्यादृष्टीकोनातून प्रशासनाच्या हालचाली सुरु असल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे याची निविदा रद्द करून त्यात नव्याने अटींचा समावेश करत कॉर्पोरेट कंपन्यांना सहभागी करून घेण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. या नव्या अटींद्वारे कॉर्पोरेट कंपन्या या महापालिकेच्या शौचालयांची उभारणी करण्यासाठीच्या निविदेत भाग घेऊ शकतील आणि मुंबईत चांगल्या दर्जाची शौचालयांची बांधणी होऊ शकेल अशाप्रकारचा विश्वास व्यक्त केला जात आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community