देशभरातील नागरिकांना एकत्र आणणारा समान नागरी कायदा पारित करण्यासाठी त्याचे विधेयक गुरुवार, २० जुलै पासून सुरू होणाऱ्या संसदेच्या पावसाळी अधिवेशनात आणावे आणि कायदा पारित करावा, अशी मागणी, अधिवेशनपूर्व सर्वपक्षीय बैठकीत शिवसेनेने केली. समान नागरी कायदा व्हावा, ही हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची इच्छा होती आणि त्यासाठीच शिवसेनेचा या कायद्याला पाठिंबा राहील, अशी प्रतिक्रिया शिवसेनेचे लोकसभेतील गटनेते खासदार राहुल रमेश शेवाळे यांनी दिली. शेवाळे म्हणाले की, ३७० कलम रद्द व्हावे आणि भव्य राममंदिर निर्माण व्हावे या बाळासाहेब ठाकरेंच्या इच्छा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्तवाखाली केंद्र सरकारने पूर्ण केल्या आहेत. आता बाळासाहेबांची समान नागरी कायद्या विषयीची तिसरी इच्छा पूर्ण करण्याची वेळ आली आहे, म्हणूनच आम्ही समान नागरी कायद्याचे समर्थन करतो.
(हेही वाचा – Aditi Tatkare : कोकणातील पूरस्थिती हाताळण्यासाठी राज्य सरकारची यंत्रणा सज्ज – अदिती तटकरे)
राष्ट्रीय लोकशाही आघाडी (एनडीए) च्या बैठकीत शिवसेनेची मागणी
संसदेच्या अधिवेशनापूर्वी आयोजित केलेल्या एनडीएच्या बैठकीत शिवसेनेने तीन महत्त्वाचे मुद्दे मांडले. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त व्हावा, मराठा आणि धनगर समाजाला आरक्षण द्यावे, यासाठी यंदाच्या अधिवेशनात सकारात्मक पाऊल उचलावे, अशी मागणी शिवसेना लोकसभा गटनेते खासदार राहुल शेवाळे यांनी केली.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community