देशातील सर्व विरोधी पक्ष हे मोदी सरकारविरुद्ध (NDA vs India) एकत्र आले आहेत. त्यांनी त्यांच्या या एकीला ‘इंडिया’ असे नाव दिले आहे. मात्र या नावावरून त्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. दिल्लीमध्ये त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
भाजपच्या विरोधात ‘इंडिया’ (NDA vs India) नावाने एकत्र आलेल्या २६ विरोधी पक्षांविरुद्ध बुधवार १९ जुलै रोजी दिल्ली पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे. राजकीय आघाडीचे नाव ‘इंडिया’ ठेवणे हे प्रतिक-चिन्ह कायद्याचे उल्लंघन असल्याचे या तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. दिल्लीचे डॉ. अविनाश मिश्रा यांनी ही तक्रार नोंदवली आहे.
(हेही वाचा – Irshalgad Landslide : मृतांच्या नातेवाईकांना राज्य सरकारकडून पाच लाखांची मदत जाहीर; आतापर्यंत ७ जणांचा मृत्यू)
कर्नाटच्या बेंगलुरू येथे मंगळवारी (१८ जुलै) झालेल्या २६ विरोधी पक्षांच्या बैठकीत आघाडीचे नाव “इंडियन नॅशनल डेमॉक्रटिक इनक्लुसीव्ह अलायन्स” (भारतीय राष्ट्रीय लोकशाही सर्वसमावेशक आघाडी) ‘इंडिया’ (NDA vs India) ठेवण्यात आले आहे. या नावावर फिर्यादी डॉ. अविनाश मिश्रा यांनी आक्षेप नोंदवत म्हंटले आहे की, एमब्लेम्स कायद्यांतर्गत भारताचे नाव कोणीही आपल्या वैयक्तिक फायद्यासाठी वापरू शकत नाही. प्रतिक कायद्याला ‘प्रतिक आणि नावे (अयोग्य वापर) कायदा’ असे म्हणतात. कायद्यानुसार, चिन्ह आणि नावांचा अयोग्य वापर टाळण्यासाठी आणि राष्ट्रीय चिन्हांचे संरक्षण करण्यासाठी या कायद्याचा वापर होतो. या कायद्यांतर्गत राष्ट्रध्वज, राष्ट्रचिन्ह, राष्ट्रगीत, राष्ट्रभाषा यांसारख्या काही विशेष चिन्हांचे संरक्षण केले जाते. त्यामुळे आघाडीचे नाव ‘इंडिया’ ठेवल्यामुळे लोकांच्या भावना दुखावल्या आहेत.
देशातील २६ राजकीय पक्षांनी देशाच्या नावाचा गैरवापर केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. तकार्रीत बंगळुरू येथे झालेल्या बैठकीचा भाग असलेल्या सर्व २६ विरोधी पक्षांची नावे आहेत.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community