पर्यावरण पुरक शाडू मातीच्या गणेशमूर्तींचा आग्रह धरणे योग्य असले, तरी पीओपीच्या गणेशमूर्ती बनविणाऱ्या मुर्तीकारांच्या पोटावर पाय देऊ नका, मुंबई महापालिकेने हिंदू सणात विघ्न आणणारे धाडसत्र थांबावावे, अशी मागणी मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार आशिष शेलार यांनी गुरुवारी विधानसभेत केली.
मुंबई महापालिकेने गणेशोत्सवातील मूर्तींबाबत कडक निर्बंध घातले आहेत. घरगुती गणेशमूर्ती ४ फुटांच्या असाव्यात, त्या शाडूमातीच्याच असाव्यात, याची अंमलबजावणी करताना पालिका धाड सत्र सुरू करणार आहे. याबाबत विधानसभेत आमदार आशिष शेलार यांनी औचित्याचा मुद्दा मांडून तीव्र नाराजी व्यक्त केली.
(हेही वाचा – Jumbo Covid Centre scam : ईडीकडून सुजित पाटकर आणि डॉ. किशोर डीसुले यांना अटक)
मूर्ती पर्यावरणपुरक असावी, हा आग्रह धरायला हरकत नाही. पण म्हणून एकाकी पीओपीच्या मुर्ती बनविणाऱ्यांंच्या पोटावर पाय देऊ नये. याबाबत स्वतः मुख्यमंत्र्यांनी बैठक घेतली होती. तसेच मुर्तीकारांनी न्यायालयात याचिकाही दाखल केली आहे. याबाबत निर्णय येणे बाकी असताना मुंबई महापालिकेने कारवाईचा बडगा उगारू नये. या व्यवसायावर हजारो जणांचे पोट अवलंबून आहे. हजारो कोटींची उलाढाल या व्यवसायात होते. त्यामुळे एकाकी त्यावर निर्बंध आणले तर मराठी व्यवसायीक उध्वस्त होतील. हा हिंदूचा सण आहे. धाडसत्र, मूर्ती जप्त करणे अशी विघ्न पालिकेने आणू नये, अशी मागणी शेलार यांनी केली.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community