Heavy Rain : रायगडमधील माथेरानमध्ये ४०० मिमी पाऊस तर कोकणातही पावसाचा मारा सुरूच

165
Heavy Rain : रायगडमधील माथेरानमध्ये ४०० मिमी पाऊस तर कोकणातही पावसाचा मारा सुरूच

सततच्या पावसाने (Heavy Rain) माऱ्याने रायगड जिल्ह्यात पुलावरील रस्ता खचणे, नद्यांना पूर येणे आदी प्रकार सुरु असतांनाच गुरुवारी २० जुलै रोजी सकाळी रायगड येथे भूस्खलनाची घटना घडली. खालापूर येथील इर्शाळवाडी येथे दरड कोसळली. रायगड मध्ये गेल्या २४ तासांत अतिमुसळधार पावसाची नोंद झाली आहे. केवळ माथेरानमध्येच ४०० मिमी पाऊस झाल्याची माहिती भारतीय वेधशाळेने दिली आहे. याच पार्श्वभूमीवर बुधवारी (१९ जुलै) रायगडला अतिवृष्टीसाठी रेड अलर्ट देण्यात आला होता.

(हेही वाचा – Jumbo Covid Centre scam : ईडीकडून सुजित पाटकर आणि डॉ. किशोर डीसुले यांना अटक)

मध्य महाराष्ट्रातील घाट परिसरात भूस्खलन (Heavy Rain) होण्याची पूर्वकल्पना बुधवारीच भारतीय वेधशाळेने दिली होती.

बुधवारी सकाळी साडेआठ वाजल्यापासून ते गुरुवारी सकाळी साडेआठ वाजेपर्यंत माथेरान येथे ४०० मिमी तर पोलादपूर येथे ३१० मिमी पावसाची (Heavy Rain) नोंद झाली. पनवेल येथे २९० मिमी, महाड २८० मिमी कर्जत, पेणला २७० मिमी, म्हाळसा २३० मिमी उरण येथे २२० मिमी पावसाची नोंद झाली आहे. नद्यांना पूर आल्याने चिपळूण आणि नजीकच्या परिसरात बुधवारपासून पाणी शिरण्यास सुरुवात झाली. चिपळूण,माणगाव येथे २२० मिमी पाऊस झाला.

मुसळधार आणि अतिवृष्टी झालेले कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील इतर जिल्हे –

पालघर

डहाणू – ३१० मिमी
पालघर – २७० मिमी
वसई – २०० मिमी

रत्नागिरी

दापोली – ३०० मिमी
मंडणगड – २७० मिमी
संगमेश्वर – २०० मिमी
वाकवाळी – १९० मिमी
खेड – १५० मिमी
गुहागर – ११० मिमी
हरणाई- १३० मिमी
रायगड –
मुरूड – १०० मिमी
ताळा – १५० मिमी

ठाणे

उल्हासनगर – ३१० मिमी
अंबरनाथ – २९० मिमी
भिवंडी – २३० मिमी
ठाणे – १९० मिमी
मुरबाड – १८० मिमी
कल्याण – १५० मिमी

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.