Irshalwadi Landslide : इर्शाळवाडीच्या दुर्घटनेवर काय म्हणाले उपमुख्यमंत्री फडणवीस? 

117

इर्शाळवाडीची भौगोलिक परिस्थिती पाहिली तर इर्शाळवाडी हे चौक माणीवली ग्रामपंचायतीमधील डोंगरदरीत वसलेली छोटीशी वाडी आहे. दुर्घटनाग्रस्त वाडी Irshalwadi Landslide उंच डोंगरावर कपारीत वसलेली होती. या वाडीकडे जाण्यासाठी रस्ता उपलब्ध नसून मौजे चौक माणवली या गावातून या वाडीपर्यंत पायी चालत जावं लागतं. वस्ती डोंगराच्या तीव्र उतारावर असल्यानं येथील दळणवळण मुख्य रस्त्याशी जोडलेले नाही. मुंबईपासून 80 किलोमीटर अंतरावर ही जागा आहे. या ठिकाणाहून संपर्क साधणंही कठीण आहे, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत म्हणाले.

प्रामुख्यानं ठाकर जमातीचे आदिवासी लोक वाडीमध्ये वास्तव्यास होते. भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षण विभागाच्या अहवालानुसार, संभाव्य दरडग्रस्त ठिकाणांच्या यादीत समाविष्ठ नव्हते. यापूर्वी सदर ठिकाणी दरड कोसळणं, भूस्खलन होणं Irshalwadi Landslide अशा घटना घडलेल्या नाहीत, असेही फडणवीस म्हणाले.

(हेही वाचा Bhayandar Building Part Collapsed : भाईंदर स्टेशन पूर्व समोरील बिल्डिंगचा भाग कोसळून तीन जण जखमी)

इर्शाळवाडीत 48 कुटुंब वास्तव्यास होती. त्यापैकी 25 ते 28 कुटुंब बाधित झाली असल्याचा प्राथमिक अंदाज आहे. 228 पैकी 70 नागरिक स्वतः घटनेच्या वेळी सुरक्षित असल्याचं प्राथमिक माहितीत आढळून आलेलं आहे. तर 21 जण जखमी असून त्यातील 17 जणांना तात्पुरत्या बैसकॅम्पमध्ये उपचार केले आहेत. तर सहा जण पनवेलमधील एमजीएम रुग्णालयात उपचार घेत आहेत. सकाळी सव्वा दहा वाजेपर्यंतच्या अहवालानुसार 10 जणांचा मृत्यू झाला आहे, अशी फडणवीसांनी माहिती दिली.

स्थानिक ट्रेकर्स, NDRF चे जवान आणि सिडकोकडून पाठवलेले मजूर यांच्याकडून सिडको मार्फक कारवाई सुरू आहे. बचावकार्यासाठी पुण्याहून रात्रीच NDRF ची दोन पथकं निघून पहाटे चार वाजता घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी बचावकार्यास सुरुवात केली. डॉग स्क्वॉडही घटनास्थळी दाखल झाले आहेत. घटनास्थळ अतिदुर्गम भागात असल्यानं डोंगराच्या पायथ्याशीच नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला आहे. त्यासाठी संपर्क क्रमांक 810 819 5554 हा आहे. पनवेलसह स्थानिक ट्रेकर्स ग्रुप बचावकार्यात मदत करत आहेत. हवाई दलाचे दोन हेलिकॉप्टर्स सांताक्रूझ विमानतळावर बचाव कार्यासाठी तयार आहेत. मात्र खराब हवामानामुळे उड्डाण होऊ शकत नाही. स्थानिक प्रशासनानं पायथ्याशी तात्पुरतं हेलिपॅड तयार केलं आहे. तसेच, घटनास्थळी प्रशासकीय अधिकारी उपस्थित आहेत. असेही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.