Manipur video : मणिपूर हिंसाचाराची सर्वोच्च न्यायालयाने स्वतःहून घेतली दखल; म्हणाले… 

172

मणिपूरमध्ये दोन महिलांची नग्न परेड Manipur video करून सामूहिक बलात्कार केल्याच्या प्रकरणावर सर्वोच्च न्यायालयाने कठोर भाष्य केले आहे. सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी, 20 जुलै 2023 या प्रकरणाची स्वत:हून दखल घेतली. हा व्हिडिओ 4 मे 2023 रोजीचा आहे, राज्यात 2 समुदायांमध्ये सुरू असलेल्या हिंसाचारादरम्यान सरन्यायाधीश (CJI) डी.वाय. चंद्रचूड यांनी भारताचे अॅटर्नी जनरल आर वेंकटरामानी आणि सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांना या प्रकरणाबाबत उपस्थित राहण्यास सांगितले आहे.

न्यायमूर्ती डी.वाय चंद्रचूड म्हणाले, मणीपूरमधील 2 महिलांची नग्न परेड केल्याच्या व्हिडिओमुळे Manipur video आम्ही खूप व्यथित झालो आहोत. या प्रकरणी आम्ही तीव्र चिंता व्यक्त करतो. सरकारने हस्तक्षेप करून अधिक कारवाई करण्याची वेळ आली आहे. हे पूर्णपणे अस्वीकार्य आहे. जातीय हिंसाचाराच्या क्षेत्रात लिंग-आधारित हिंसाचार करण्यासाठी महिलांचा शस्त्रे म्हणून वापर करणे खूप खेदजनक आहे. यासोबतच सरन्यायाधीश डी.वाय चंद्रचूड यांनीही मानवाधिकार आणि संविधानाच्या उल्लंघनाचे हे सर्वात मोठे प्रकरण असल्याचे स्पष्ट केले. तथापि, सर्वोच्च न्यायालयाने असेही म्हटले आहे की, हा व्हिडिओ 4 मे 2023 रोजीचा आहे हे माहित आहे परंतु त्यामुळे काही फरक पडत नाही. CJI म्हणाले की, आम्ही सरकारला कारवाई करण्यासाठी थोडा वेळ देऊ, पण काही झाले नाही तर आम्हाला कारवाई करावी लागेल. ही घटना अशी घडली आहे का कुणास ठाऊक, असा प्रकार सुरू असल्याचे ते म्हणाले.

(हेही वाचा Bhayandar Building Part Collapsed : भाईंदर स्टेशन पूर्व समोरील बिल्डिंगचा भाग कोसळून तीन जण जखमी)

सर्वोच्च न्यायालयाने ही घटना घडल्यापासून काय कारवाई केली आणि अशा घटना पुन्हा घडू नयेत यासाठी कोणती पावले उचलली याचा तपशीलही मागवला आहे. दरम्यान, मणिपूरचे मुख्यमंत्री एन बिरेन सिंग यांनीही म्हटले आहे की, हा व्हिडिओ समोर येताच मणिपूर पोलिसांनी या प्रकरणाची स्वत:हून दखल घेत कारवाई केली. याप्रकरणी गुरुवारी सकाळी पहिली अटक करण्यात आली आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. यासोबतच सर्व दोषींवर कडक कारवाई केली जाईल, फाशीची शिक्षा ठोठावण्यात येईल, असे आश्वासनही त्यांनी दिले आहे. या घृणास्पद कृत्याला आपल्या समाजात स्थान नाही, हे प्रत्येकाने जाणून घेतले पाहिजे, असेही ते म्हणाले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.