मणिपूरची (Manipur Video) घटना लज्जास्पद असून या घटनेमधील दोषींवर लवकरात लवकर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले. या घटनेमुळे जगात भारताचे नाव खराब होत असल्याचेही पंतप्रधान मोदी म्हणाले. संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी ते बोलत होते.
मणिपूर हिंसाचारादरम्यान (Manipur Video) दोन महिन्यांपूर्वी महिलांची विवस्त्र धिंड काढण्यात आली होती. यासंदर्भातील व्हिडीओ आत्ता व्हायरल करण्यात आला आहे. या लज्जास्पद घटनेवर पंतप्रधान मोदी यांनी कठोर कारवाईची ग्वाही दिली आहे. तसेच मुख्यमंत्री एन बिरेन यांना त्यांच्या राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था आणखी कठोर करण्याचे निर्देश देखील दिले आहेत.
(हेही वाचा – Jumbo Covid Centre scam : ईडीकडून सुजित पाटकर आणि डॉ. किशोर डीसुले यांना अटक)
आता या प्रकराणात (Manipur Video) राज्य सरकारकडूनही कठोर भूमिका घेण्यात येत आहे. या प्रकराणातील दोषींचा शोध घेण्यात येत असून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याचे निर्देश राज्य सरकारकडून देण्यात आले आहेत. याप्रसंगी पंतप्रधानांनी सांगितले की, हे पावसाळी अधिवेशन महत्त्वाचे असणार आहे. या अधिवेशनात जी विधेयकं मांडली जाणार आहेत ती थेट जनतेच्या हिताशी निगडीत आहेत. युवा पिढी डिजिटल जगाचे नेतृत्व करत आहे, अशावेळी डेटा संरक्षण विधेयक हे देशातील प्रत्येक नागरिकाला नवा आत्मविश्वास देणारे असणार आहे. यामुळे जगात भारताची प्रतिष्ठा वाढण्यास मदत होणार आहे. नॅशनल रिसर्च फाऊंडेशन हे नवीन शैक्षणिक धोरणाच्या संदर्भात एक नवे पाऊल आहे. या विधेयकावर संसदेत गांभीर्याने चर्चा करण्यात येणार आहे.
संसदेच्या पावसाळी अधिवेशनाला आज, गुरुवार २०जुलै सुरुवात झाली असून हे अधिवेशन ११ ऑगस्टपर्यंत असणार आहे. या अधिवेशनात एकूण ३१ विधेयकांवर चर्चा करण्यात येणार आहे. तसेच या कालावधीत संसदेच्या दोन्ही सभागृहांच्या एकूण १७ बैठका प्रस्तावित करण्यात आलेल्या आहेत. या अधिवेशनात विरोधकही सरकारला अनेक मुद्यांवर घेरण्याच्या तयारीत आहेत.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community