Irshalgad Landslide : दीड तासांची पायपीट करून मुख्यमंत्री शिंदे यांनी घेतला परिस्थितीचा आढावा

149
Irshalgad Landslide : दीड तासांची पायपीट करून मुख्यमंत्री शिंदे यांनी घेतला परिस्थितीचा आढावा

रायगड जिल्ह्यातील खालापूर जवळील इर्शाळवाडी (Irshalgad Landslide) येथे दरड कोसळून झालेल्या दुर्घटनेतील मदतकार्याला वेग देण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वतः चालत घटनास्थळी जाण्याचा निर्णय घेतला. घटनास्थळी पोहोचून त्यांनी प्रत्यक्ष मदतकार्याचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी आतापर्यंत या दुर्घटनेमध्ये १२ जणांचा मृत्यू झाला असून मदतकार्य सुरू असल्याचे सांगितले.

दरम्यान काही तरुणांनी मुख्यमंत्री शिंदे यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत ‘एनडीआरएफ’ (Irshalgad Landslide) पथकाच्या मार्गदर्शनाखाली मदतकार्याला सुरुवात केली आहे. रायगड जिल्ह्यातील यशवंती हाइकर्स, निसर्ग ग्रुप पनवेल या स्वयंसेवी संस्थेचे स्वयंसेवक, मौजे चौक आणि मौजे वरोसे येथील ग्रामस्थ, विविध विभागाचे शासकीय कर्मचाऱ्यांसह एमआयडीसी मध्ये काम करणारे पाचशेहून अधिक मजूर या मदतकार्यात स्वतःहून सहभागी झाले आहेत. याशिवाय जखमींवर उपचार करण्यासाठी तसेच लोकांचे गडाच्या पायथ्याशी तात्पुरते पुनर्वसन करण्यासाठी रत्नागिरीहुन १० कंटेनर देखील मागवण्यात आले आहेत.

(हेही वाचा – Irshalwadi Landslide : इर्शाळवाडीच्या दुर्घटनेवर काय म्हणाले उपमुख्यमंत्री फडणवीस? )

तसेच गावकऱ्यांनी स्वतःहून दुर्घटनाग्रस्त (Irshalgad Landslide) गावातील नागरिकांना मदत करण्यासाठी पुढाकार घेतला असून जेवण, पिण्याचे पाणी आणि इतर सामुग्री पाठवण्याची व्यवस्था केली आहे.

आदित्य ठाकरे देखील घटनास्थळी दाखल

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मंत्री उदय सामंत, गिरीश महाजन, दादा भुसे, विधान परिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्यानंतर आता ठाकरे गटाचे आदित्य ठाकरे देखील घटनासथळी (Irshalgad Landslide) दाखल झाले आहेत. यावेळी त्यांनी स्थानिक नागरिकांशी संवाद साधत धीर देण्याचा प्रयत्न करत आहेत. या नागिरकांचं आदित्य ठाकरे सांत्वन करत आहेत. यावेळी आदित्य ठाकरे यांनी माध्यमांशी संवाद साधला. अनिल परब आणि सुनील प्रभू देखील आदित्य ठाकरे यांच्यासोबत इर्शाळवाडीत आहेत.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.