मणिपूरमध्ये दोन महिलांची निर्वस्त्र धिंड काढून त्यांच्यावर सामूहिक अत्याचार करण्यात आल्याच्या घटनेने संपूर्ण देश हादरला आहे. या घटनेवर मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी गुरुवार, २० जुलै रोजी ट्विटद्वारे संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. राज ठाकरे ट्विटद्वारे म्हणाले, “कालपासून मणिपूरमधील समाजमाध्यमांवर जी दृश्य समोर आली आहेत ती हादरवणारी आहेत आणि दोन्ही सरकारांना लाज वाटायला लावणारी आहेत.”
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहांना लिहिलेल्या पत्राविषयी राज ठाकरे म्हणाले, “मी काही दिवसांपूर्वीच पंतप्रधान महोदयांना आणि गृहमंत्र्यांना पत्र लिहून विनंती केली होती की आता तरी ह्या विषयात लक्ष घालून मणिपूरमध्ये शांतता प्रस्थापित होईल हे पहा, पण परिस्थिती ‘जैसे थे’ आहे. आणि हेच दुर्दैव आहे.”
कालपासून मणिपूर मधली समाजमाध्यमांवर जी दृश्य समोर आली आहेत ती हादरवणारी आहेत, आणि दोन्ही सरकारांना लाज वाटायला लावणारी आहेत. मी काही दिवसांपूर्वीच पंतप्रधान महोदयांना आणि गृहमंत्र्यांना पत्र लिहून विनंती केली होती की आता तरी ह्या विषयात लक्ष घालून मणिपूरमध्ये शांतता प्रस्थापित…
— Raj Thackeray (@RajThackeray) July 20, 2023
(हेही वाचा – Irshalwadi Landslide : इर्शाळवाडीत किती पडला पाऊस ज्यामुळे होत्याचे नव्हते झाले?)
“ह्या प्रकरणातील जे गुन्हेगार आहेत त्यांना फाशीचीच शिक्षा व्हायला हवी. पण त्याच वेळेस जर केंद्र सरकारकडून ठोस कृती होणार नसेल तर, आता राष्ट्रपती महोदयांनी ह्यात लक्ष घालायला हवं. मणिपूरमध्ये गेल्या ३ महिन्यात जे घडलं त्याने फक्त मणिपूरच नाही तर संपूर्ण भारताच्या समाजमनावर ओरखडा उमटला आहे आणि ह्यातून काही वर्षांनी एखादं आक्रीत घडलं तर त्याला मात्र सध्याचंच सरकार जबाबदार असेल. पंतप्रधानांनी आत्ता जरी ह्या घटनेचा निषेध केला असला तरी तो पुरेसा नाही, आता कृती करा, अन्यथा ईशान्य भारत कायमचा भारतापासून तुटेल, अशा शब्दात राज ठाकरेंनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community