अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसच्या 9 आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आणि पक्षामध्ये फूट पडली. अजित पवार यांच्यासोबत राष्ट्रवादीचे बहुतांश आमदार आहेत. एवढच नाही तर अजित पवार गटाने निवडणूक आयोगात आपणच राष्ट्रवादी काँग्रेस असल्याचा दावा केला आहे. तसंच पक्षाने आपली पक्षाचा अध्यक्ष म्हणून नेमणूक केल्याचंही निवडणूक आयोगाला सांगण्यात आलं आहे.
एकीकडे महाराष्ट्रामध्ये झालेल्या या राजकीय भूकंपानंतर नागालँडमधल्या राष्ट्रवादी काँग्रेसनेही अजित पवारांना पाठिंबा दिला आहे. नागालँडमध्ये निवडून आलेल्या सर्व 7 आमदार आणि पदाधिकाऱ्यांनी अजित पवारांसोबत जायचा निर्णय घेतला आहे.
राष्ट्रवादीचा एनडीपीपी-भाजपला पाठिंबा
नागालँडमध्ये वर्षाच्या सुरूवातीला झालेल्या निवडणुकांमध्ये एनडीपीपी-भाजप युतीला 37 जागांसह स्पष्ट बहुमत मिळालं होतं. एनडीपीपीला 25 आणि भाजपला 12 जागांवर यश मिळालं. नागालँडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने एनडीपीपी-भाजपला स्पष्ट बहुमत असतानाही त्यांना पाठिंबा द्यायचा निर्णय घेतला. नागालँडमध्ये राष्ट्रवादीचे 7 आमदार निवडून आले. या 7 आमदारांनीच आता अजित पवारांसोबत जायचा निर्णय घेतला आहे.
Join Our WhatsApp Community