रायगड जिल्ह्यातील मोरबे डॅमच्या वरील बाजूस असलेल्या इर्शाळवाडीवर बुधवार १९ जुलै रोजी रात्री उशिरा दरड (Irshalgad Landslide) कोसळली. ही दरड कोसळल्याने अनेक कुटुंब मलब्याखाली अडकले आहेत. आतापर्यंत या दुर्घटनेत १६ जणांचा मृत्यू झाला असून १०३ जणांना वाचवण्यात यश आहे आहे. मात्र अजूनही अनेकजण ढिगाऱ्याखाली अडकल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. सततच्या मुसळधार पावसामुळे बचावकार्यात अडचणी येत आहे. आज म्हणजेच शुक्रवार २१ जुलै रोजी सकाळपासूनच इर्शाळवाडीत पावसाला सुरुवात झाली आहे.
(हेही वाचा – Irshalwadi Landslides : मुंबई महापालिकेची यंत्रणा आणि कर्मचाऱ्यांचा बचाव कार्यात सहभाग)
रायगडातील इर्शाळवाडीवर (Irshalgad Landslide) ही अत्यंत दुर्गम भागातील वस्ती आहे. त्यामुळे तेथील बचावकार्यात अडचण येत आहे. या वाडीत एकूण ४० ते ४७ घरं होती. त्यातील १४ ते १७ घरांवर दरड कोसळली आहे. या घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना राज्य सरकारकडून ५ लाखांची मदत जाहीर करण्यात आली असून कालचा (गुरुवार २० जुलै) संपूर्ण दिवस मुख्यमंत्री एकनाथ शिंदे घटनास्थळी हजर होते. तेथील बचावकार्य कसे चालू आहे याकडे त्यांनी जातीने लक्ष दिले.
एकनाथ शिंदे : ‘कार्यकर्ता मुख्यमंत्री’
👉सविस्तर वाचा | https://t.co/pqSbXby1It pic.twitter.com/7m5pc2VPAB— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) July 20, 2023
सरकारी संस्थांच्या मदतीला खाजगी संस्थांच्या टीम
सरकारी संस्थांच्या मदतीला आता खाजगी संस्थांच्या टीमदेखील हजर झाल्या आहेत. रिलायन्स फाऊंडेशनने कम्युनिकेशन चांगले होण्यासाठी ham radio सिस्टीम प्रस्थापित केली आहे, जेणेकरुन वर असलेल्या टीम्ससोबत खालून चांगल्या प्रकारचे आणि लवकर कम्युनिकेट करता येईल, सोबतच त्यांच्याबरोबर डॉक्टर आणि सर्च अॅण्ड रेस्क्यू टीम देखील आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community