Ajit Pawar : नागालँडच्या ७ आमदारांचे अजित पवारांना समर्थन

ब्रजमोहन श्रीवास्तवांनी जाहीर केले समर्थन पत्र

228
Ajit Pawar : नागालँडच्या ७ आमदारांचे अजित पवारांना समर्थन

नागालँड मधल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्वच्या सर्व म्हणजेच ७ आमदारांनी अजित पवारांना (Ajit Pawar) पाठिंबा दिला आहे. याची घोषणा काल म्हणजेच गुरुवार २० जुलै रोजी पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस आणि प्रवक्ता ब्रजमोहन श्रीवास्तव यांच्या सहीचे पत्र जारी करून करण्यात आली.

शरद पवारांनी काही दिवसांपूर्वी खासदार सुप्रिया सुळे आणि खासदार प्रफुल्ल पटेल यांची कार्यकारी अध्यक्ष पदी नेमणूक करताना नवी दिल्लीत घेतलेल्या बैठकीत याच ७ आमदारांचा सत्कार केला होता. सत्काराच्या त्या राजकीय खेळीतून शरद पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेस हा राष्ट्रीय पातळीवरचा पक्ष आहे, हे दाखविण्याचा प्रयत्न केला होता. पण आता या प्रयत्नांनाच त्या आमदारांनी खोडा घालत अजित पवारांच्या (Ajit Pawar) राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. नागालँड मधील सर्वच्या सर्व ७ आमदार अजित पवारांच्या राष्ट्रवादीत आल्याने तिथल्या राष्ट्रवादीत फूट पडली नसून अख्खी राष्ट्रवादीच अजित पवारांच्या राष्ट्रवादीत विलीन झाली आहे.

(हेही वाचा – Jaipur Earthquake : भूकंपाच्या धक्क्यांनी जयपूर हादरले: अर्ध्या तासात भूकंपाचे तीन जोरदार धक्के)

अजित पवार (Ajit Pawar) गटाने निवडणूक आयोगात आपणच राष्ट्रवादी काँग्रेस असल्याचा दावा केला आहे. तसेच त्यांनी पक्षाचा अध्यक्ष म्हणून आपलीच नेमणूक केल्याचंही निवडणूक आयोगाला सांगितले आहे. नागालँड मधील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवारांच्या गटात सामील झाल्यामुळे अजितदादांचा पक्षावरचा दावा मजबूत झाला आहे. नागालँडमध्ये वर्षाच्या सुरूवातीला झालेल्या निवडणुकांमध्ये एनडीपीपी-भाजप युतीला ३७ जागांसह स्पष्ट बहुमत मिळाले होते. एनडीपीपीला २५ आणि भाजपला १२ जागांवर यश मिळाले. नागालँडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने एनडीपीपी-भाजपला स्पष्ट बहुमत असतानाही त्यांना पाठिंबा द्यायचा निर्णय घेतला. नागालँडमध्ये राष्ट्रवादीचे ७ आमदार निवडून आले. या ७ आमदारांनीच आता अजित पवारांसोबत जायचा निर्णय घेतला आहे.

नागालँडमध्ये (Ajit Pawar) राष्ट्रवादी काँग्रेस भाजपसोबत एकत्र का आले याचे कारण शरद पवारांनी त्यावेळी स्पष्ट केले होते. ‘निकाल लागल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे ७ विधानसभा सदस्य निवडून आले. निवडणुकीच्या काळात तिथल्या मुख्यमंत्र्यांना आमचा पाठिंबा होता. आमचा पाठिंबा त्या ठिकाणच्या मुख्यमंत्र्यांना आहे, त्यामुळे भाजपसोबत आम्ही युती केलेली नाही, असे शरद पवार म्हणाले होते.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.