Heavy Rain : विदर्भात पुढील चार दिवस मुसळधार तर मुंबईला ऑरेंज अलर्ट

163
Heavy Rain : विदर्भात पुढील चार दिवस मुसळधार तर मुंबईला ऑरेंज अलर्ट

गेल्या काही दिवसांपासून राज्यात पुन्हा एकदा पावसाचा जोर (Heavy Rain) वाढला आहे. त्यामुळेच हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार पुढचे काही दिवस राज्यात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात येत आहे. अशातच आज (शुक्रवार, २१ जुलै) मुंबईला ऑरेंज आणि रायगडला रेड अलर्ट देण्यात आला असून विदर्भात पुढील चार दिवस मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर दुसरीकडे ठाण्यातील सर्व शाळांना आज सुट्टी देण्यात आली आहे.

आज पालघर, ठाणे, रायगड, पुणे या चार जिल्ह्यांना रेड (Heavy Rain) अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर मराठवाड्यात मध्यम, विदर्भात बहुतेक ठिकाणी जोरदार वारे वाहून तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

प्रशासनाचे नागरिकांना आवाहन

ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या पाच जिल्ह्यांत मुसळधार पावसामुळे (Heavy Rain) अनेक अपघात घडले आहेत. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून या पाचही जिल्ह्यातील शाळांना आजही सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. तसेच येथील नागरिकांनी घराबाहेर पडताना काळजी घ्यावी, आवश्यक असेल तरच घराबाहेर पडावे, असं आवाहन देखील जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आली आहे.

(हेही वाचा – Jaipur Earthquake : भूकंपाच्या धक्क्यांनी जयपूर हादरले: अर्ध्या तासात भूकंपाचे तीन जोरदार धक्के)

मुंबईत आज शाळा सुरू राहणार आहेत. पावसाची परिस्थिती (Heavy Rain) पाहून इतर निर्णय घेतली जातील, असे प्रशासनाने सांगितले आहे. तर पुण्यातील दुर्गम भागातील शाळा आजही बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. आंबेगाव, खेड, जुन्नर, भोर, पुरंदर, मुळशी, मावळ या तालुक्यातील दुर्गम क्षेत्रातील २५५ शाळा आज बंद ठेवण्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश दिले आहेत.

जाणून घ्या कुठल्या भागात कोणता अलर्ट

रेड अलर्ट : पालघर, ठाणे, रायगड, पुणे

ऑरेंज अलर्ट : मुंबई, रत्नागिरी, सातारा

यलो अलर्ट : सिंधुदुर्ग, नंदुरबार, नाशिक, कोल्हापूर, परभणी, अकोला, अमरावती, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशिम, यवतमाळ

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.