पोलीस एनओसी घोटाळा : दोन आरटीओ दलालांना अटक

दुसऱ्यांचा पत्ता वापरून रिक्षा चालकांना पोलीस मिळवून देत होते एनओसी

287
Bengaluru Blast: बेंगळुरू बॉम्बस्फोटप्रकरणी एनआयएची कारवाई, पश्चिम बंगालमधून आरोपी आणि सूत्रधाराला अटक
Bengaluru Blast: बेंगळुरू बॉम्बस्फोटप्रकरणी एनआयएची कारवाई, पश्चिम बंगालमधून आरोपी आणि सूत्रधाराला अटक

नोकरी, शिक्षणासह इतर ठिकाणी सक्तीचे करण्यात आलेल्या ‘पोलीस परवाना प्रमाणपत्र’ (पोलीस एनओसी) घोटाळा समोर आला आहे. याप्रकरणी मुंबईतील निर्मल नगर पोलिसांनी दोन आरटीओ दलालांना अटक केली आहे, या दोघांनी मागील दोन महिन्यांत अनेकांना बोगस पत्यावर पोलीस प्रमाणपत्र दिल्याचा संशय व्यक्त केला जात असून पोलीस तपासात ११ प्रकरणे समोर आली आहे. या घोटाळ्यात पोलीस कर्मचाऱ्यांचा सहभाग आहे का, याची पडताळणी सुरू असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे. जयप्रकाश गुप्ता आणि प्रदीप गुप्ता असे अटक करण्यात आलेल्या आरटीओ दलालांची नावे आहेत.

सांताक्रूझ पूर्व वाकोला परिसरात राहणारे मनोज खंदारे यांच्या राहत्या घराच्या पत्यावर ११ मे ते २ जुलै दरम्यान पोस्टाने वेगवेगळ्या नावाने आणि एकाच पत्यावर पत्रे प्राप्त झाली होती. खंदारे यांनी ती पत्रे उघडली असता त्यात पोलीस पडताळणी प्रमाणपत्र, रिक्षा परवाने, बॅच परवाना होता. ही पत्रे आपल्या पत्यावर का आली यामुळे गोंधळून गेलेल्या खंदारेंना संशय आल्यामुळे त्यांनी निर्मल नगर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार अर्ज दाखल केला व आलेली पत्रे अर्जाला जोडून पोलीस ठाण्यात जमा केली. निर्मल नगर पोलिसांनी हे प्रकरण गंभीरपणे घेऊन तात्काळ तपास सुरू केला असता पोलिसांच्या तपासात धक्कादायक अशी माहिती समोर आली.

ही पत्रे वेगवेगळ्या नावाने मात्र एकाच पत्यावर आली होती, त्या पत्रांमध्ये असलेले रिक्षा परवाना, मुंबई पोलिसांच्या विशेष शाखेकडून देण्यात येणारी पोलीस पडताळणी प्रमाणपत्रे होती. पोलिसांनी या पत्रावर असलेल्या नावाच्या व्यक्तीचा शोध घेतला असता या सर्व व्यक्ती मुंबईच्या बाहेर म्हणजे मुंब्रा, भाईंदर, मीरा रोड इत्यादी परिसरात राहणाऱ्या होत्या. त्यांचा शोध घेतल्यानंतर त्यांना पोलीस ठाण्यात बोलावून चौकशी करण्यात आली असता त्यांनी रिक्षा परवाने आणि पोलीस पडताळणी प्रमाणपत्रे काढण्यासाठी आरटीओ दलाल जयप्रकाश गुप्ता आणि प्रदीप गुप्ता यांना प्रत्येकी, १० ते १२ हजार रुपये दिले होते. जयप्रकाश गुप्ता याने खंदारेंच्या घराचा भाडेतत्वाचा खोटा करारनामा तयार केला होता. व हा करारनामा पोलीस पडताळणीसाठी इतर कागदपत्रांसह ऑनलाइन अपलोड केला केला होता. त्यानुसार ही सर्व कागदपत्रे खंदारे यांच्या पत्यावर आली होती.

(हेही वाचा – स्टॅनफोर्ड विद्यापीठ औषधनिर्माण विभागाच्या प्राध्यापकांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट)

ज्या लोकांचे रिक्षा परवाने आणि त्यासाठी लागणारे पोलीस पडताळणी प्रमाणपत्र तयार करण्यात आले होते ती लोक मुंबईच्या बाहेर राहण्यास आल्यामुळे मुंबईत त्यांचे रिक्षा परवाने निघाले नसते म्हणून जयप्रकाश गुप्ता आणि प्रदीप गुप्ता यांनी खोटी कागदपत्रे सादर करून याप्रकारे फसवणूक केल्याचे समोर आले. याप्रकरणी निर्मल नगर पोलिसांनी गुन्हा दाखल करून जयप्रकाश गुप्ता आणि प्रदीप गुप्ता या दलालांना अटक केली आहे. पोलीस पडताळणीसाठी पोलीस खंदारे यांच्या घरी गेली होती का? किंवा पडताळणी न करताच विशेष शाखेला अहवाल पाठवण्यात आला याबाबत याबाबत प्रश्न निर्माण झाला असून याबाबत अधिक चौकशी करण्यात येत असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. या दलालांनी याप्रकारे अनेकांची खोटी कागदपत्रे सादर करून याप्रकारचे परवाने आणि पोलीस पडताळणी प्रमाणपत्रे दिली असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.