Cyber Crime : महिलांचे फोटो मॉर्फ करून खंडणी मागणाऱ्या सायबर गुन्हेगाराला अटक

183
Cyber Crime : महिलांचे फोटो मॉर्फ करून खंडणी मागणाऱ्या सायबर गुन्हेगाराला अटक
Cyber Crime : महिलांचे फोटो मॉर्फ करून खंडणी मागणाऱ्या सायबर गुन्हेगाराला अटक

एका व्यापाऱ्याच्या पत्नीचे फोटो मॉर्फ करून तो फोटो सर्वत्र व्हायरल करण्याची धमकी देऊन खंडणी मागणाऱ्या ३१ वर्षीय इसमाला पश्चिम बंगाल मधून अटक करण्यात आले आहे. अटक करण्यात आलेला इसम हा सायबर गुन्हेगार त्याने अनेक महिलांचे याप्रकारे फोटो मॉर्फ करून खंडण्या उकळल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. अब्दुल रहेमान हासानुर मंडल (३१) असे अटक करण्यात आलेल्या सायबर गुन्हेगाराचे नाव आहे.

अब्दुल मंडल हा पश्चिम बंगाल येथे २४ नॉर्थ परगणा जिल्ह्यात राहणारा आहे. काही आठवड्यापूर्वी दक्षिण मुंबईतील एका व्यापाऱ्याच्या व्हॉट्सअॅपवर एक अनोळखी क्रमांकावरून कॉल आला होता. कॉल करणाऱ्या व्यक्तीने व्यापाऱ्याकडे १४ हजार रुपयांची मागणी केली होती, दरम्यान व्यापाऱ्याने त्याला कसले पैसे असे विचारले असता “तुझा व्हॉट्सअॅप उघडून बघ’ असे बोलून त्याने फोन बंद केला. व्यापाऱ्याने व्हॉट्सअॅप उघडले असता त्यात अनोळखी क्रमांकावरून त्याच्या पत्नीचे मॉर्फ केलेले विवस्त्र अवस्थेतील फोटो आढळून आले.

(हेही वाचा – मुंबईतील झोपडपट्टीधारकांचा मोठा तिढा सुटण्याची शक्यता; अतुल सावेंची माहिती)

काही वेळाने पुन्हा त्याच क्रमांकावरून कॉल आला व पैसे लवकर पाठव नाही तर सर्व फोटो तुझ्या कॉन्टॅक्ट लिस्टमधील सर्वांना फॉरवर्ड करेल अशी धमकी दिली. हा प्रकार व्यापाऱ्याने पत्नीला सांगितला, त्याला तीला फोटो बघून धक्काच बसला काही वेळाने व्हॉट्सअॅपवर आलेला कॉल रिसिव्ह केला असता कॉल करणाऱ्याने अश्लील भाषेचा वापर करून, यूपीआय पाठवला आहे, त्याच्यावर पैसे पाठवण्यास सांगितले. याप्रकरणी व्यापाऱ्याने लोकमान्य टिळक मार्ग पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली. पोलिसानी गुन्हा दाखल करून वरिष्ठ पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांचे एक पथक आरोपीच्या मागावर गेले व पश्चिम बंगला येथून अब्दुल मंडळ याला अटक करण्यात आली आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.