UPA – I.N.D.I.A ने साधूचे रुप धारण केल्याने रावण आदर्श ठरत नाही!

147
  • जयेश शत्रुघ्न मेस्त्री

२०२४ची निवडणूक म्हणजे महायुद्ध ठरणार आहे. आपण याआधीच पाहिलं आहे की विरोधक टुलकीटचा वापर करत आहेत. अगदी परदेशी लोकही मोदी सरकारला पाडण्यासाठी मदत करताना दिसले. सीएए – एनआरसी वरुन भडकलेली दंगल, शाहीन बाग असे किती तरी कारस्थान हे सरकार पाडण्यासाठी करण्यात आले. मात्र नरेंद्र मोदी आपल्या मार्गावरुन चालत राहिले. आता विरोधकांनी वैयक्तिक जीवनावर हल्ले चढवायला सुरुवात केली आहे.

महाराष्ट्रात तर विरोधकांमुळे राजकारणाची पातळी खालावली आहे. महाविकास आघाडी स्थापन झाल्यानंतर ज्या गोष्टी घडल्या त्या काळिमा फासणार्‍या होत्या. सूड उगवून सरकार चालवता येतं असा एक संदेश आघाडीने दिला. आता तर विरोधात बसूनही खालच्या पातळीवर जाता येतं, हे विरोधकांनी दाखवून दिलं आहे. महाराष्ट्रातील हे युद्ध सुरुच राहणार आहे. पूर्वी कॉंग्रेस आणि त्यांच्या मित्र पक्षांच्या गटाला UPA (United Progressive Alliance) म्हणायचे आता I.N.D.I.A (Indian National Democratic Inclusive Alliance) म्हटलं जाणार आहे.

(हेही वाचा Irshalwadi landslide : इर्शाळवाडी दुर्घटनेत 20 जणांचा मृत्यू; विधानसभेत मुख्यमंत्री शिंदे यांचे निवेदन )

इंडिया इज इंदिरा हे नाटक करुन झाल्यानंतर आता विरोधकांनी हे नवे नाटक सुरु केलं आहे. I.N.D.I.A या नावावरुन लोकांच्या मनात आपल्याविषयी जागा निर्माण करण्याचा प्रयत्न सुरु झाला आहे. मात्र लोक या नाटकाला खरोखर भुलतील का? सगळं करुन भागले आणि देव पुजेला लागले अशातला हा प्रकार झाला. विरोधकांनी एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की रावण साधूचा वेश धारण करुन आला म्हणून तो आदरणीय किंवा पूजनीय ठरत नाही. लोकांना त्याचे मनसुबे चांगलेच माहिती आहेत. साधू झालेला रावण हा सीतेचे अपहरण करण्यासाठी आला होता, हे लोकांना कळतं. I.N.D.I.A नाव धारण केलेले UPA म्हणजे साधूच्या वेशेतला रावण आहे. हा रावण देशातली शांतता भंग करायला आला आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.