सलग तीन दिवस मुंबईसह उपनगरांत मुसळधार पावसाने (Heavy Rain) हजेरी लावली आहे. अशातच मुंबईत शुक्रवारी (२१ जुलै) सकाळी आठ वाजल्यापासून ते सायंकाळी सहापर्यंत पावसाने (Heavy Rain) चांगलाच मारा केला. त्यानंतर काही तासांच्या विश्रांतीनंतर शुक्रवार रात्री ते भल्या पहाटेपर्यंत पुन्हा मुसळधार पाऊस झाला. मुंबईत शुक्रवारी काही भागात १०० मिमी इतक्या पावसाची नोंद झाली. तर शनिवारीही मुंबईत मुसळधार पावसासाठी मुंबई प्रादेशिक हवामान खात्याने ऑरेंज अलर्ट जारी केला आहे.
(हेही वाचा – Marathwada : मराठवाड्यातील 1 लाख 5 हजार 754 शेतकरी आत्महत्या करण्याच्या विचारात; शासनाचाच अहवाल)
शुक्रवारी संध्याकाळी ६ वाजेपर्यंत विक्रोळीत १३० मिमी, चेंबूरमध्ये ११६ मिमी, मरोळला १२४ मिमी आणि वांद्रे येथे १०१ मिमी पाऊस झाला. फोर्ट परिसरात ९८ मिमी आणि दादरला ९१ मिमी पावसाची नोंद झाली. खारमध्ये ८८ मिमी, लोअर परेलला ८४ मिमी पाऊस झाला. वरळी येथे ७५ मिमी, खारमध्ये ८८ मिमी, भांडूप येथे ५१ मिमी, मुलुंड येथे ५२ मिमी, मारिन लाईन्स येथे ६० मिमी तर हाजी अली परिसरात ६५ मिमी पावसाची नोंद झाली.
संध्याकाळी मुंबईत बऱ्याच भागात वाहतूक कोंडीचीही समस्या आढळून आली. रात्री आठच्या सुमारास पावसाची संततधार पुन्हा सुरु झाली. त्यानंतर रात्री अकरापासून पावसाने जोर धरला. रात्री उशिरापर्यंत पाऊस सुरुच होता.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community