Eknath Shinde : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्ली दरबारी, राज्यात चर्चेला उधाण

180
Eknath Shinde : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्ली दरबारी, राज्यात चर्चेला उधाण

राज्यात मुख्यमंत्री बदलाच्या चर्चा सुरू असतांनाच आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) सहकुटुंब दिवसभर दिल्लीत आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज म्हणजेच शनिवार २२ जुलै रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची दिल्लीत भेट घेणार आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा मुख्यमंत्री बदलाच्या चर्चा रंगल्या आहेत. मुख्यमंत्री शिंदे यांची ही पाचवी भेट असून आठवड्याभरातली तिसरी भेट असल्याचे देखील बोलले जात आहे. मुख्यमंत्री शिंदेंची अचानकपणे दिल्ली वारी होत असल्याने आणि त्यातच अजित पवार लवकरच मुख्यमंत्री (Eknath Shinde) होणार अशा प्रकारचे बॅनर मुंबईत झळकल्याने पुन्हा चर्चा रंगल्या आहेत.

अजित पवार लवकरच होणार मुख्यमंत्री! अमोल मिटकरींचे ट्विट चर्चेत

अजित पवार यांनी राष्ट्रवादीत बंड केल्यानंतर देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यासोबत ते सत्तेत सहभागी झाले आहेत.अनेक वेळा उपमुख्यमंत्री पद भोगलेले असल्याने तेव्हाच अजित पवारांना मुख्यमंत्री पदाचा शब्द देऊनच भाजपने सत्तेत सहभागी केल्याची चर्चा रंगली आहे. आता राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी लवकरच अजित पवार हे मुख्यमंत्री होणार असल्याचे ट्विट केल्याने त्यांच्या ट्विटची चांगलीच चर्चा रंगली आहे.

(हेही वाचा – Heavy Rain : मध्यरात्रीही मुंबईत पावसाचा कहर)

अमोल मिटकरी यांच्यासोबतच ठाकरे गटाचे संजय राऊत यांनीदेखील अजित पवार लवकरच मुख्यमंत्री होणार असल्याचा दावा केला होता.

भाजपने अजित पवारांना शब्द दिला आहे – पृथ्वीराज चव्हाण

राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी बंड करत एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत हातमिळवणी केली होती. त्यामुळे राज्यातील राजकारणात मोठा भूकंप आला होता. राष्ट्रवादीत उभी फूट पडल्यानंतर शरद पवार आणि अजित पवारांमध्ये वितुष्ट आल्याच्या चर्चाही रंगल्या. मात्र अजित पवार यांना भाजपने मुख्यमंत्री पदाचा शब्द दिल्याचा दावा काँग्रेसनेते पृथ्वीराज चव्हाण यांनी केला.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.