Livestock Sector : पशुधन क्षेत्रासाठीच्या पहिल्या “पत हमी योजने” चा प्रारंभ

195
Livestock Sector : पशुधन क्षेत्रासाठीच्या पहिल्या
Livestock Sector : पशुधन क्षेत्रासाठीच्या पहिल्या "पत हमी योजने" चा प्रारंभ

पशुधन क्षेत्रात गुंतलेल्या सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांना (एमएसएमई) कर्ज वितरणाची प्रणाली मजबूत करण्यासाठी तसेच जोखीमरहित विनातारण सुरळीत कर्ज उपलब्ध होण्यासाठी, पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय विभाग, केंद्रीय पशुसंवर्धन, मत्स्यपालन आणि दुग्धव्यवसाय मंत्रालयाने ′पत हमी योजना′ लागू केली आहे. या पशुसंवर्धन पायाभूत सुविधा विकास निधी (AHIDF) अंतर्गत पशुसंवर्धन आणि दुग्ध व्यवसाय विभागाने ७५० कोटी रुपयांचा पत हमी निधी न्यास स्थापन केला आहे. हा न्यास पात्र कर्ज देणाऱ्या संस्थांद्वारे सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांना विस्तारित पत सुविधांच्या २५ टक्क्यांपर्यंत पत हमी कवच प्रदान करेल.

या पतहमी योजनेमुळे, सेवा न मिळालेल्या किंवा अत्यल्प सेवा मिळालेल्या पशुधन क्षेत्रासाठी सुलभ वित्तपुरवठा सुलभ करू शकेल, मुख्यत्वे पहिल्या पिढीतील उद्योजकांना आणि समाजातील वंचित घटकांना, ज्यांना त्यांच्या उपक्रमांना पाठिंबा देण्यासाठी संपार्श्विक सुरक्षा नसते. वैयक्तिक उद्योजक, खाजगी कंपन्या, सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग, शेतकरी उत्पादक संघटना (एफपीओ) आणि कलम ८ अंतर्गत येणाऱ्या कंपन्या ज्या डेअरी प्रक्रिया आणि मूल्यवर्धन पायाभूत सुविधा, मांस प्रक्रिया आणि मूल्यवर्धन पायाभूत सुविधा, पशुखाद्य संयंत्र, पशु जाती सुधार तंत्रज्ञान आणि जाती गुणन फार्म, पशु कचरा संपत्ती व्यवस्थापन (कृषी कचरा व्यवस्थापन) आणि पशुवैद्यकीय लस आणि औषधे उत्पादन सुविधांची स्थापना यांच्या गुंतवणुकीला प्रोत्साहन देण्यासाठी १५००० कोटी रुपयांच्या “पशुसंवर्धन पायाभूत सुविधा विकास निधी” (AHIDF) च्या पंतप्रधानांच्या आत्मनिर्भर भारत अभियान प्रोत्साहन पॅकेज अंतर्गत पत हमी निधी न्यासाची स्थापना मंजूर करण्यात आली आहे.

(हेही वाचा – जखम असताना साचलेल्या पावसाच्या पाण्यातून चाललात, तर दुर्लक्ष करू नका..)

पशुसंवर्धन पायाभूत सुविधा विकास निधी योजनेच्या प्रमुख वैशिष्ट्यांपैकी एक म्हणजे ७५० कोटी रुपयांच्या पतहमी निधी न्यासाची स्थापना. पशुसंवर्धन आणि दुग्ध व्यवसाय विभागाने एनएबी (NAB) एनएबी संरक्षण ट्रस्टी कंपनी प्रायव्हेट लिमिटेडच्या सोबतीने या ट्रस्टची स्थापना केली आहे. नाबार्डची पूर्ण मालकी असलेल्या ही उपकंपनी पशुसंवर्धन पायाभूत सुविधा विकास निधी (AHIDF) योजनेंतर्गत सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांना पतहमी योजनेचा विस्तार करणाऱ्या या न्यासाच्या स्थापनेसाठी तयार करण्यात आली आहे. मार्च २०२१ मध्ये स्थापन झालेला हा निधी न्यास कृषी आणि पशुसंवर्धन क्षेत्रातील पशुसंवर्धन पायाभूत सुविधा विकास निधी (AHIDF) च्या पतहमी योजनेंतर्गत देशातील पहिला फंड न्यास असून पशुसंवर्धन आणि दुग्ध व्यवसाय विभागाने (DAHD) हाती घेतलेला एक महत्त्वाचा उपक्रम आहे, ज्यामुळे पशुसंवर्धन पायाभूत सुविधा विकास निधी (AHIDF) चा लाभ मिळवणाऱ्या सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग केंद्रांची संख्या झपाट्याने वाढू आणि बँकांकडून विणातारण कर्ज मिळवण्यासाठीची व्यवस्था मजबूत होईल. ३ टक्के व्याज दराची सवलत देणार असून, कोणत्याही शेड्यूल्ड बँक, राष्ट्रीय सहकारी विकास महामंडळ (NCDC) यांच्याकडून एकूण प्रकल्प खर्चाच्या ९० टक्क्यांपर्यंत कर्ज देण्याची सुविधा पशुसंवर्धन पायाभूत सुविधा विकास निधी (AHIDF) योजनेची प्रमुख वैशिष्ट्ये मार्फत देण्यात येणार आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.