IND vs PAK : सामना पाहण्यासाठी चाहत्यांनी गाठले थेट रुग्णालय

190
IND vs PAK : सामना पाहण्यासाठी चाहत्यांनी गाठले थेट रुग्णालय

मंगळवार २७ जून रोजी आयसीसी कडून (IND vs PAK) वर्ल्ड कप २०२३ चे वेळापत्रक जाहीर करण्यात आले. त्यानुसार आयसीसीने एक पत्रकार परिषद घेऊन हे वेळापत्रक जाहीर केले. त्यानुसार भारत आणि पाकिस्तान यांच्यातील हाय होल्टेज सामना हा १५ ऑक्टोबर रोजी होणार असून अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडिअवर हा थरार रंगणार आहे.

हा सामना (IND vs PAK) बघण्यासाठी क्रिकेट चाहत्यांमध्ये प्रचंड उत्साह आहे. याचे उत्तम उदाहरण अहमदाबादमधून पाहायला मिळत आहे. भारत पाकिस्तान सामन्याच्या दिवशी संपूर्ण शहरातील हॉटेल्स फुल झाल्याने क्रिकेटप्रेमींनी चक्क रुग्णालयातील खोल्या बुक केल्या आहेत.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, १५ ऑक्टोबर रोजी शहरातील हॉटेलच्या दारात चक्क २० पटींनी वाढ होऊन त्याची किंमत ५९ हजार इतकी आहे. असे असून देखील सर्व हॉटेल्स हाऊसफुल्ल झाली आहेत.

(हेही वाचा – Yavatmal Flood : पुराच्या पाण्यात अडकलेल्यांना हेलिकॉप्टरच्या साहाय्याने बाहेर काढणार – उपमुख्यमंत्री फडणवीस)

अहमदाबादमधील आयटीसीचे “वेलकम हॉटेल” सामन्याच्या दिवशी ७२,००० रुपये आकारत आहेत. तर शहरातील इतर अनेक हॉटेल्स जसे की ‘टीसी नर्मदा’, ‘कोर्टयार्ड बाय मॅरियट’ इत्यादी हॉटेल्स फुल्ल झाली आहेत.

त्यामुळे भारत पाकिस्तानचा सामना (IND vs PAK) पाहण्यासाठी चाहत्यांनी आता रुग्णालयांच्या खोल्या बुक केल्या आहेत. विशेष म्हणजे त्यांच्यासाठी तिथे खाण्यापिण्याची सोयदेखील केली जाणार आहे. अशाच एका रुग्णालयाचे डॉ. पारस शाह यांनी अहमदाबाद मीडियाला सांगितले की, “हे रुग्णालय असल्यामुळे, आम्ही संपूर्ण शरीर तपासणी करण्याची मागणी करत आहोत, त्यामुळे आमचे दुहेरी उद्दिष्टे पूर्ण होणार आहे. आम्ही सध्या या लोकांना ऑफर मध्ये डिलक्स किंवा स्वीट रूम्स जरी राहायला दिली तरी ते रहाण्यासाठी तयार आहेत. आम्ही, एनआरआयकडून बुकिंग घेण्यास मनाई केली आहे, कारण आमची प्राथमिकता रुग्णांची काळजी व त्यांची गैरसोय न होऊ देणे ही आहे. माझ्या अमेरिकेच्या मित्रांनी देखील माझ्या हॉस्पिटलमध्ये राहण्याची चौकशी केली आहे कारण माझ्याकडे विशेष आणि सामान्य अशा दोन्ही खोल्या आहेत. भारत-पाक सामना पाहण्यासाठीचा हा सगळा खटाटोप आहे.”

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.