Parashuram Ghat : परशुराम घाटात प्रकाशव्यवस्था, २४ तास यंत्रणा सज्ज

157
Parashuram Ghat : परशुराम घाटात प्रकाशव्यवस्था, २४ तास यंत्रणा सज्ज

मुंबई-गोवा महामार्गावरील महत्त्वाच्या परशुराम घाटात (Parashuram Ghat) अतिवृष्टीमुळे दरडीचा धोका कायम असल्याने तेथे प्रकाशव्यवस्था आणि अन्य सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. शिवाय जेबीसी व अन्य यंत्रणादेखील सज्ज ठेवण्यात आली आहे.

महामार्गावरील परशुराम घाटात (Parashuram Ghat) चौपदरीकरण केल्यानंतर दरडीचा धोका वाढला आहे. पावसाळा सुरू झाल्यापासून आतापर्यंत चार वेळा दरड कोसळली आहे. बुधवारी म्हणजेच १९ जुलै रोजी परशुराम घाटात दरड कोसळली होती. त्याआधी कुंभार्ली घाटात दरड कोसळली, त्यापाठोपाठ परशुराम घाटात दरड कोसळल्याने प्रशासनाची तारांबळ उडाली होती. परशुराम घाटातील दरड बाजूला करेपर्यंत वाहतूक थांबविण्यात आली होती. त्या कालावधीत तात्पुरत्या स्वरूपात पर्यायी चिरणी मार्गाने वाहतूक वळवली होती. मात्र त्यानंतर तातडीने रस्त्यावर आलेले दगड व माती हटवून आधी एकेरी व त्यानंतर दुहेरी वाहतूक सुरू करण्यात आली.

(हेही वाचा – मुख्यमंत्री शिंदे आणि पंतप्रधान मोदी यांच्या भेटीदरम्यान राज्याच्या प्रकल्पांवर चर्चा)

अजूनही पावसाचा जोर कायम आहे. त्यामुळे परशुराम घाटातील (Parashuram Ghat) दरडीचा धोका टळलेला नाही. त्यादृष्टीने राष्ट्रीय महामार्ग आणि ठेकेदार कंपनीने उपाययोजना सुरू केल्या आहेत. घाटातील मध्यवर्ती ठिकाणी दरडीचा मोठा धोका असल्याने तेथे वीज उपलब्ध केली आहे. रात्री-अपरात्री रस्त्यावर आलेली माती किंवा दगड वाहतूकदारांना सहजपणे दिसावी, असे नियोजन करण्यात आले आहे. त्याशिवाय दरड हटविण्यासाठी जेसीबी आणि पोकलेनची व्यवस्था तैनात केली असून घाटातील प्रत्येक हालचालीवर बारीक लक्ष ठेवण्यात आले आहे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.