भारतीयांना एचआयव्हीबाबत काही प्रश्न विचारण्यात आले. या सर्व्हेच्या माध्यमातून वय, सेक्शुअल पार्टनर्स तसंच त्यांची संख्या यांची माहिती मिळाली. यावेळी काही धक्कादायक आणि मोठी माहिती देखील समोर आली आहे. या अहवालाच्या माध्यमातून एक धक्कादायक बाब समोर आली ती म्हणजे, जर स्त्रिया एका महिन्यापेक्षा जास्त काळ घराबाहेर राहिल्या असतील तर त्यांच्या सेक्शुअल पार्टनर्सची संख्या सरासरी 1.7 च्या तुलनेत 2.3 टक्क्यांनी वाढली. यावेळी 56 टक्के मुलींनी कबूल केलं की, त्या घराबाहेर असल्यावर संबंध ठेवतात. तर 32 टक्के पुरुष घराबाहेर असताना संबंध ठेवण्यास प्राधान्य देतात.
पती पत्नी घरात जोडीदार असून देखील बाहेर शारीरिक संबंध ठेवतात, अशीही माहिती यातून समोर आली आहे. दरम्यान यामुळे एचआयव्ही होण्याचा धोका वाढतो. सर्वेक्षणात 15-49 वयोगटातील महिला आणि पुरुषांना त्यांच्या एका वर्षातील लैंगिक जीवनाबद्दल विचारण्यात आले. यावेळी एक टक्क्यापेक्षा कमी म्हणजे 0.3 टक्के आणि एक टक्के पुरुषांनी एकापेक्षा जास्त जोडीदारांसोबत शारीरिक संबंध ( Physical Relation ) असल्याचं सांगितलं. तर एक टक्क्यापेक्षा कमी महिला आणि 4 टक्के पुरुषांच्या म्हणण्यानुसार, त्यांनी पती-पत्नी किंवा जोडीदाराव्यतिरिक्त इतर लोकांशी संबंध ठेवले आहेत. या सर्व्हेक्षणातून अजून एक बाब समोर आली ती म्हणजे, एक महिन्यापेक्षा जास्त काळ घराबाहेर राहिल्यानंतरही इतर लोकांशी संबंध निर्माण होण्याची शक्यता वाढते. मुख्य म्हणजे यामध्ये सुशिक्षित आणि श्रीमंत असणाऱ्या व्यक्तींमध्ये हे प्रमाण अधिक दिसून आलं.
(हेही वाचा Amit Thackeray : अमित ठाकरेंची गाडी अडवली म्हणून टोलनाकाच फोडला )
शारीरिक संबंध ठेवण्याचे सरासरी दिवस
नॅशनल फॅमिली हेल्थ सर्व्हेमध्ये असं दिसून आलंय की, महिला आणि पुरुष सरासरी सात दिवसांच्या अंतराने शारीरिक संबंध ठेवतात. तर वयानुसार महिलांशी संबंध ठेवण्याच्या अंतरामध्ये वाढ होते. ज्या पुरुष आणि स्त्रिया यांचं लग्न होऊन बराच काळ लोटला आहे असे व्यक्ती अविवाहित लोकांपेक्षा कमी शारीरिक संबंध ठेवतात.
Join Our WhatsApp Community