मानसिक आरोग्याला पाठबळ देण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारच्यावतीने सुरु करण्यात आलेली टेले मानस हेल्पलाईन क्रमांक आता आठवडाभर २४ तास उपलब्ध करण्यात आला आहे. ही सुविधा २४ तास १४४१६ आणि १८००-८९१४४१६ या हेल्पलाईन क्रमांकावर उपलब्ध करण्यात आली आहे. ही सेवा चोवीस तास उपलब्ध केली हवी अशी मागावी जोर धरू लागल्याने आरोग्य विभागाने या मागणीला मान्यता दिली. जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्ताने टेले-मेंटल हेल्थ सपोर्ट आणि नेटवर्किंग (टेले-मानस) उपक्रम सर्व राज्यांमध्ये सुरु करण्यात आला आहे. केंद्र सरकारतर्फे २३ टेली-मेंटल हेल्थ सेंटर्स ऑफ एक्सलन्स नेटवर्क तयार करण्यात आले आहे.
जागतिक मानसिक आरोग्य दिनापासून टेले- मेंटल हेल्थ सपोर्ट आणि ‘नेटवर्किंग’ (टेली-मानस) उपक्रम सर्व राज्यांमध्ये सुरू करण्यात आला आहे. ताण-तणावामुळे अनेकांना मानसिक आरोग्य सेवेची आवश्यकता असते. संकटात असलेले कोणीही, परीक्षेचा ताण असलेले विद्यार्थी, कौटुंबिक समस्या, आत्मघाती विचार, एखाद्या पदार्थाचे व्यसन संबंधित समस्या, नातेसंबंध, स्मृती संबंधी समस्या, आर्थिक ताण त्याचप्रमाणे इतर कोणतीही मानसिक आरोग्य विषयक चिंता आणि समस्या असलेले कोणीही १४४१६ आणि १८००-८९१४४१६ या क्रमांकांवर संपर्क साधून मोफत सल्ला आणि समुपदेशन 24 तासात कधीही सेवा घेऊ शकता.
टोल-फ्री हेल्पलाइन क्रमांकाद्वारे कॉलर सेवांचा लाभ घेण्यासाठी रुग्ण त्यांच्या आवडीची भाषा निवडू शकतात. हा कॉल संबंधित राज्य आणि केंद्रशासित प्रदेशातील टेली-मानस सेलकडे पाठवला जातो. टेले-मानस ही सेवा दोन-स्तरीय प्रणालीमध्ये चालविली जाते. या अंतर्गत टियर-१ मध्ये प्रशिक्षित समुपदेशक आणि मानसिक आरोग्य तज्ज्ञांचा समावेश असलेल्या राज्य टेली मानस सेलचा समावेश आहे. टियर-२ मध्ये शारीरिक समुपदेशनासाठी जिल्हा मानसिक आरोग्य कार्यक्रम (DMHP) वैद्यकीय महाविद्यालयाची संसाधने तसेच दृकश्राव्य समुपदेशनासाठी ई-संजीवनीच्या तज्ञांचा समावेश असेल.
(हेही वाचा Amit Thackeray : अमित ठाकरेंची गाडी अडवली म्हणून टोलनाकाच फोडला )
Join Our WhatsApp Community