Asaduddin Owaisi : ना राहुल गांधी, ना ममता बॅनर्जी, ना अखिलेश यादव मुसलमानांचे सहानुभूतीदार; काय म्हणाले ओवैसी?

170

अखिलेश यादव, ममता बॅनर्जी, राहुल गांधी आणि मायावती या सर्वांनीच अल्पसंख्याक समाजाचे मोठे नुकसान केले आहे. कुणी घाबरवून, कुणी हासून, कुणी कवाली म्हणून तर कुणी गोल टोपी घालून आम्हाला लॉलीपॉप दिले. कुणीही मुसलमानांचे सहानुभूतीदार नाही, असे ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लीमीनचे (एआयएमआयएम) नेते आणि हैदराबादचे खासदार असदुद्दीन ओवेसी म्हणाले.

उत्तर प्रदेशच्या इतिहासात  मुस्लिमांची जेवढी मते त्यांना मिळाली (2022 मध्ये) तेवढी कुणालाही मिळाली नाहीत. तरीही भाजपला हरवू शकले नाही. आता त्यांच्याच एका आमदाराचा पेट्रोलपंप तोडला जातो, तरी बोलू शकत नाहीत. राहुल गांधींवर निशाणा साधत ओवेसींनी प्रश्न केले की, राहुल गांधी यांच्या पक्षाचे मुख्यमंत्री जी.बी. पंत यांच्याच काळात बाबरी मशिदीचा मुद्दा सुरू झाला नाही? आपले वडील पंतप्रधान असतानाच कुलूप उघडले गेले नाही? जेव्हा मशीद पाडली गेली, तेव्हा आपल्याच पक्षाचे पंतप्रधान होते? यांच्याच सरकारच्या  काळात 1986 मध्ये 350 मुस्लीमांना गोळ्या घातल्या गेल्या, असे ओवैसी म्हणाले.

(हेही वाचा Government Report : घरापासून दूर असल्यावर 56% मुली ठेवतात शारीरिक संबंध; सरकारच्या धक्कादायक अहवाल)

ममता बॅनर्जी यांचा उल्लेख करत ओवेसी म्हणाले, आपण कधी पश्चिम बंगालमध्ये जाऊन मुस्लिमांचा सामाजिक आणि शैक्षणिक स्तर बघा. मालदा आणि मुर्शिदाबादमधील मुस्लीम महिलांची बोटे बघा. बिडी तयार करून-करून भाजलेली आहेत. मालदा, मुर्शिदाबादच्या भूजलामध्ये आर्सेनिकचे प्रमाण WHO च्या निर्धारित मानकापेक्षा अधिक आहे. मायावतींसंदर्भात बोलताना ओवेसी म्हणाले, ते या तिघांपेक्षा त्यांचा अधिक आदर करतात. मुख्यमंत्री झाल्यावर त्यांनी SC-ST समाजाला एक ओळख आणि राजकीय ताकद दिली. मात्र त्यांनी काही बाबतीत स्पष्ट भूमिका घेतली नाही, याचे दुःख आहे. म्हणूनच आज त्या कमकुवत दिसत आहेत, असे ओवैसी म्हणाले.

अखिलेश यादव यांच्यासंदर्भात बोलताना ओवेसी म्हणाले, उत्तर प्रदेशच्या इतिसाहात मुस्लिमांची जेवढी मते त्यांना मिळाली (2022 मध्ये) तेवढी कुणालाही मिळाली नाहीत. तरीही भाजपला हरवू शकले नाही. आता त्यांच्याच एका आमदाराचा पेट्रोलपंप तोडला जातो, तरी बोलू शकत नाहीत, असे ओवैसी म्हणाले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.