Heavy Rain : दिल्ली, महाराष्ट्रानंतर आता गुजरातमध्ये पावसाचा हाहाकार 

128

पावसाने आधी उत्तराखंड, दिल्ली बुडविली,  त्यानंतर महाराष्ट्रापाठोपाठ आता गुजरात पुराच्या पाण्यात बुडू लागले आहे. अहमदाबाद विमानतळ, हॉस्पिटल आदी पाण्याखाली गेले आहे. गेल्या काही दिवसांपासून देशात अतिवृष्टी होऊ लागली आहे. अहमदाबाद आणि जुनागडसह गुजरातमधील अनेक जिल्ह्यांमध्ये पावसामुळे पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे.

रस्त्यांवर पाणी साचल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. घराबाहेर उभ्या असलेल्या गाड्या पाण्याच्या प्रवाहात वाहून जात आहे. याशिवाय लोकांना अहमदाबाद विमानतळावर प्रवास करण्या पूर्वी एअरलाइन्सशी संपर्क साधण्याचा सल्लाही देण्यात आला आहे. अहमदाबाद विमानतळावर मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते आणि लोकांना पार्किंगबाबत अनेक समस्यांना सामोरे जावे लागले. या संदर्भात अहमदाबाद विमानतळावरील प्रवाशांनी प्रवास सुरू करण्यापूर्वी संबंधित विमान कंपनीशी संपर्क साधून फ्लाइट तपासण्याचे आवाहन करण्यात आले आहे. यासोबतच प्रवाशांना पार्किंग टाळण्याचा सल्लाही देण्यात आला आहे.

(हेही वाचा Government Report : घरापासून दूर असल्यावर 56% मुली ठेवतात शारीरिक संबंध; सरकारच्या धक्कादायक अहवाल)

अहमदाबादमधील सिव्हिल हॉस्पिटलमध्येही पूर आला असून, त्याचा व्हिडिओही समोर आला आहे. शनिवारी रात्री सिव्हिल हॉस्पिटलच्या ट्रॉमा वॉर्डमध्ये पाणी साचले होते, मात्र आता परिस्थिती नियंत्रणात आली आहे. जुनागडमध्ये परिस्थिती अशी झाली होती की, लोकांना घराबाहेर न पडण्याचे आवाहन करावे लागले. पावसामुळे संपूर्ण शहर जलमय झाले होते. १९८३ नंतर प्रथमच येथे इतक्या पावसाची नोंद झाली आहे. शहरात बांधलेल्या बेसमेंट पार्किंगमध्येही पाणी साचले होते. पाण्याचा प्रवाह इतका जोरात होता की अनेक वाहने त्यात बुडाली. एवढेच नाही तर लिफ्ट आणि पायऱ्यांमधूनही पाणी येऊ लागले. रायजीबाग म्हणजेच जुनागडचा पॉश एरिया येथे पावसामुळे महागडी वाहनेही खेळण्यांसारखी वाहू लागली. त्याचवेळी पुराच्या पाण्यात म्हशीही अडकल्या होत्या. आता रस्त्यांवरून पाणी ओसरले असले तरी परिस्थिती अजूनही बिकट आहे. एकमेकांवर वाहनांचे ढीग पडले असून जनजीवन विस्कळीत झाले आहे.गुजरातमधील बहुतांश भागात पावसामुळे अडचणी निर्माण झाल्या होत्या. द्वारकेत नाले अडवले गेले आणि पाणी साचले. बाजारपेठांमध्ये दोन ते तीन फूट पाणी साचले. दुसरीकडे, नवसारी येथे सकाळी १० ते दुपारी १२ या दोन तासांत ९ इंच पाऊस झाला. दोन तासांच्या मुसळधार पावसाने नवसारी आणि विजलपूर शहरातील अनेक भाग पाण्याखाली गेले. शहरात जाणाऱ्या सर्वच रस्त्यांवर पाणी साचले आहे. जुनाठाणा परिसरातील गॅस एजन्सीच्या गोदामाचे गेट पाण्याच्या प्रवाहामुळे उघडले. यानंतर येथे ठेवलेले गॅस सिलिंडर पाण्यात वाहून गेले. त्याचा व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.